शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात बोअरवेल ट्रकने चारजणांना चिरडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:12 IST

दुचाकीवरील तिघे लग्न समारंभातून येत होते

वैजापुर (औरंगाबाद ) : तालुक्यातील अंचलगाव जवळ एका भरधाव बोअरवेल ट्रकने चारजणांना चिरडल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये तीन दुचाकीस्वार व एका पादचाऱ्याचा समावेश आहे. अक्षय प्रकाश पवार ( २१), अविनाश देविदास पवार ( २२), जगदीश विलास पवार (२२, तिघेही रा.खंडाळा) पादचारी छगन रूस्तम पवार ( ७०, रा.लोणी खुर्द) अशी मृतांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा अक्षय प्रकाश पवार ( २१), अविनाश देविदास पवार ( २२), जगदीश विलास पवार हे तिघे वाकला येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न सोहळा उरकुन ते एकाच दुचाकीवर खंडाळाकडे परतण्यास निघाले. यावेळी एक बोअरवेल ट्रक शिवुर बंगलाकडून लोणी खुर्दकडे जात होता. रस्त्यातील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने रस्त्यावरील पादचारी छगन रूस्तम पवार यांना चिरडले. अनियंत्रित ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पादचारी  छगन रूस्तम पवार आणि दुचाकीवरील  अक्षय पवार, अविनाश पवार व जगदीश पवार यांचा जागीच मृत्यू झाला. 

मृतामधील जगदीश हा औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. तर अक्षय व अविनाश हे दोघे शेती करत असत. तर लोणी खुर्द येथील छगन पवार हे विनायक शैक्षणिक संस्थेचे संचालक होते.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातhighwayमहामार्ग