महिलेचे अपहरण करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: April 21, 2015 00:53 IST2015-04-21T00:43:43+5:302015-04-21T00:53:54+5:30
सिल्लोड : चाळीसगाव येथून जामनेरला जाणाऱ्या आडगाव येथील एका ३६ वर्षीय महिलेस गुंगीचे औषध दिले. तिला सिल्लोड येथील साईपूजा हॉटेलमध्ये आणून मारहाण

महिलेचे अपहरण करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
सिल्लोड : चाळीसगाव येथून जामनेरला जाणाऱ्या आडगाव येथील एका ३६ वर्षीय महिलेस गुंगीचे औषध दिले. तिला सिल्लोड येथील साईपूजा हॉटेलमध्ये आणून मारहाण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सिल्लोड पोलिसांनी हॉटेलचालकास ताब्यात घेतले आहे; मात्र हॉटेलचालकास मदत करणारा वेटर फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी दुपारी एक ३६ वर्षीय महिला चाळीसगाव येथून जामनेरला जाण्यासाठी एसटीमध्ये बसली होती. या बसमध्ये पोपट रंगनाथ सोनवणे (रा. सिल्लोड) हाही बसलेला होता. तो सिल्लोड येथील डोंगरगाव फाट्यावरील हॉटेल साईपूजाचा चालक आहे. त्याने महिलेस गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून डोंगरगाव फाट्यावर असलेल्या त्याच्या हॉटेलमध्ये आणले. यादरम्यान त्या महिलेला शुद्ध आली. तिने हिंमत दाखवून बाजूला असलेल्या एका रूममध्ये जाऊन मोबाईलवरून १०० नंबर डायल केला व पोलीस कंट्रोल रूमला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे सपोनि एम.के. वानखेडे, फौजदार एस.बी. कापुरे, महिला पोलीस कर्मचारी आव्हाड, मारकड यांनी शहरातील जवळपास सर्व हॉटेल पिंजून काढल्या. तपासणी करीत असताना हॉटेल साईपूजामध्ये पोलिसांना ही महिला व हॉटेलचालक पोपट रंगनाथ सोनवणे सापडला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या फरार साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. पोपट सोनवणे यास सिल्लोड येथील न्यायालयात हजर केले असता त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात महिलेचे अपहरण करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नआलीमहिलेचे अपहरण करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न आहे.