डोक्यात कुुऱ्हाडीचा घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

By | Updated: December 2, 2020 04:09 IST2020-12-02T04:09:58+5:302020-12-02T04:09:58+5:30

गंगापूर : कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून एका जणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना काळेगाव ...

Attempt to kill with an ax wound to the head | डोक्यात कुुऱ्हाडीचा घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

डोक्यात कुुऱ्हाडीचा घाव घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

गंगापूर : कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून एका जणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना काळेगाव येथे शनिवारी दुपारी ३.३० वाजेदरम्यान घडली. यामध्ये कृष्णा साबदे हा गंभीर जखमी झाला.

गंगापूर तालुक्यातील काळेगाव शिवारात शनिवारी आरोपी कृष्णा आबाराव पवार, भरत आबाराव पवार, राहुल कृष्णा पवार, अलका कृष्णा पवार, रंजना भारत पवार (सर्व रा. दिघी) यांचा कृष्णा साबदे यांच्या शेतातील विहिरीजवळील फ्यूजमध्ये विद्युततारेचा आकडा टाकण्याच्या कारणावरून संजय सूर्यभान साबदे व त्यांचा पुतण्या कृष्णा साबदे यांच्याशी वाद झाला. यावेळी आरोपींनी साबदे यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच भारत पवार याने कृष्णा साबदेच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले. यावेळी हा घाव वाचविताना संजय साबदे यांच्या हातालाही गंभीर जखम झाली. याप्रकरणी संजय साबदे यांच्या फिर्यादीवरुन रविवारी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विनायक शेळके करीत आहेत.

Web Title: Attempt to kill with an ax wound to the head