बनावट पीआरकार्डद्वारे जागा हडपण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: June 5, 2017 00:27 IST2017-06-05T00:25:58+5:302017-06-05T00:27:06+5:30

जालना : येथील डॉ. फ्रेजर बॉईज शाळेच्या जागेचे बनावट पीआरकार्ड तयार करून २०९३.६३ चौरस मीटर जागा परस्पर भाडेपट्ट्यावर दिल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

An attempt to grab space through a fake PRcard | बनावट पीआरकार्डद्वारे जागा हडपण्याचा प्रयत्न

बनावट पीआरकार्डद्वारे जागा हडपण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील डॉ. फ्रेजर बॉईज शाळेच्या जागेचे बनावट पीआरकार्ड तयार करून २०९३.६३ चौरस मीटर जागा परस्पर भाडेपट्ट्यावर दिल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत छबूराव कसबे, सुभाष तुकाराम भालेराव, अविनाश कव्हळे, जी.एन. बहुरे (सर्व.रा.जालना) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
या प्रकरणी चर्च आॅफ नार्थ
इंडिया या धार्मिक संस्थेच्या मराठवाडा प्रांताचे धर्मगुुरू मधुकर उत्तमराव कसाब यांनी फिर्यादी दिली आहे. शहरातील नगरभूमापन क्रमांक ४६६५ वर संस्थेची १२० वर्षांपासून २१ हजार ६८१ चौरस मीटर जागा आहे. या ठिकाणी संस्थेतर्फे डॉ. फे्रजर बॉईज स्कूल चालवली जाते.
संशयित प्रशांत छबूराव कसबे, सुभाष तुकाराम भालेराव यांनी संस्थेच्या जागेचे आपल्या नावाने बनावट पीआरकार्ड तयार केले. या आधारे पालिकेतून आवश्यक कागदपत्रे नसतानाही या जागेवर व्यावसायिक उद्देशाने आराखडा मंजूर करून घेतला.

Web Title: An attempt to grab space through a fake PRcard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.