पुरातन नाल्यावर भराव टाकून पात्र वळविण्याचा प्रयत्न
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:05+5:302020-12-04T04:08:05+5:30
औरंगाबाद- नाशिकरोडवरील माळीवाडा गावाच्या पूर्व दिशेस एक कि. मी. अंतरावरुन ऐतिहासिक मोमबत्ता तलावाचा सांडवा वाहतो. सांडव्याच्या या नाल्यावर एका ...

पुरातन नाल्यावर भराव टाकून पात्र वळविण्याचा प्रयत्न
औरंगाबाद- नाशिकरोडवरील माळीवाडा गावाच्या पूर्व दिशेस एक कि. मी. अंतरावरुन ऐतिहासिक मोमबत्ता तलावाचा सांडवा वाहतो. सांडव्याच्या या नाल्यावर एका व्यावसायिकाने चक्क मातीचा भराव टाकून त्याचे पात्र बदलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मोमबत्ता तलाव काठोकाठ भरल्यानंतर सांडवा वाहायला सुरुवात होते. त्यानंतर या सांडव्यातील पाणी देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूच्या खंदकात भरते. हे खंदक भरले की, हा नाला पुढे माळीवाडा, आसेगावमार्गे पुढे जातो. नागरिकांनी याबाबत प्रशासनाला कळविले आहे. याबाबत औरंगाबाद तहसीलदारांना नागरिकांनी निवेदन दिले असून कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर माजी सरपंच जगन्नाथ भगत, माजी उपसरपंच भीमराज बर्डे, नवनाथ आढाव, अप्पासाहेब ढंगारे, संतोष चोपडे, नामदेव धनायत, नवनाथ आढाव, भूषण बर्डे, गणेश हेकडे, बाबूलाल चोपडे, शंकर बाभळे, जनार्दन मुळे, सुधाकर गाजरे, चंदू बर्डे, मारुती जगधने, रमेश भगत, नितीन मुळे, अविनाश मुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चौकट
शेतात पाणी शिरण्याचा धोका
नाला वाहू लागल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी वाढून सिंचनाची सोय होते. मात्र, नाला बुजला तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. या नाल्यावर कृषी विभागाने सिमेंट बंधारा बांधलेला असून या पाण्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न निकाली निघतो. मात्र, तो दाबल्यानंतर सिंचनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या कामाला परिसरातील नागरिकांनी विरोध सुरु केला आहे.
फोटो : नाल्यावर टाकण्यात येत असलेला मातीचा भराव.