बीड शहरात दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: July 23, 2014 00:30 IST2014-07-22T23:00:29+5:302014-07-23T00:30:45+5:30

बीड: येथील प्रमुख बाजारपेठेतील ज्वेलरी दुकान व रेडीमेड कपड्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सोमवारी रात्री केला.

Attempt to break down two shops in Beed city | बीड शहरात दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न

बीड शहरात दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न

बीड: येथील प्रमुख बाजारपेठेतील ज्वेलरी दुकान व रेडीमेड कपड्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सोमवारी रात्री केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली आहे.
शहरातील सुभाष रोड भागावरील लोळगे ज्वेलर्सच्या दुकानाचे कुलूप व कोंडा तोडला मात्र चॅनल गेट असल्याने चोरट्यांना दुकानात प्रवेश करता आला नाही. तसेच माऊली रेडीमेड ड्रेसेस या दुकानाचेही लॉक तोड्यात आले मात्र तेथेही त्यांना आत जाता आले नाही. सकाळी सचिन लोळगे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना शटरचे लॉक तोडले असल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती व्यापारी असोसिएशनला दिली.
पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली. असे प्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही व दुकानाबाहेर गार्ड ठेवण्याच्या सूचना व्यापारी असोसिएशनचे मंगेळ लोळगे व इतरांना दिल्या.
पांडुरंग वसंतराव लोळगे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे गस्तीची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Attempt to break down two shops in Beed city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.