आष्टीत बँक फोडण्याचा प्रयत्न फसला

By Admin | Updated: June 26, 2017 00:36 IST2017-06-26T00:34:41+5:302017-06-26T00:36:18+5:30

आष्टी : तालुक्यातील खडकत येथील सेन्ट्रल बँक आॅफ इंडिया या शाखेमधील तिजोरीच्या खोलीमधील सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला

The attempt to break the bank failed | आष्टीत बँक फोडण्याचा प्रयत्न फसला

आष्टीत बँक फोडण्याचा प्रयत्न फसला

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यातील खडकत येथील सेन्ट्रल बँक आॅफ इंडिया या शाखेमधील तिजोरीच्या खोलीमधील सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला. हा चोरीचा प्रयत्न फसल्याने बँकेतील लाखो रूपये सुरक्षित राहिले आहेत. आष्टी पोलिसांत तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
खडकत येथील जामखेड ते माहिजळगाव या रस्त्यावर सेन्ट्रल बँक आॅफ इंडियाची शाखा गावाच्या बाहेरील बाजूस आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता शाखेतील व्यवहार संपल्यानंतर शाखा बंद करण्यात आली. मध्यरात्रीनंतर पहाटे ३ ते ३.३० च्या दरम्यान विनानंबरच्या जीपमधून आलेल्या चोरट्यांनी प्रथम बँकेच्या शटर चॅनल गेटचे कुलूप व सायरनचे कनेक्शन तोडून आत प्रवेश केला.
तसेच कॅशिअर काऊंटरचे आणि व्यवस्थापकाच्या काऊंटर ड्रॉवरचे कुलूप तोडून उचकापाचक केली. त्यानंतर त्यांनी तिजोरीकडे आपला मोर्चा वळविला. दरवाजा उघडताच तेथील सायरन वाजला आणि चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. पहाटेच्या सहरच्या नमाजसाठी उठलेल्या मुस्लीम बांधवांना सायरनचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी बँकेच्या दिशेने धाव घेतली असता हा प्रकार दिसून आला.
बँकेमध्ये खाजगी मजुरीने असलेले बबन जेवे यांनी हा प्रकार मुख्य रोखपाल गणेश शिंदे यांना दूरध्वनीवरून कळवला. तोपर्यंत आष्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी तिजोरीतील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे समजले. शाखा व्यवस्थापक, मुख्य रोखपाल गणेश शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश गोडसे यांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ३.२६ वा. २५ ते ३० वयोगटातील तीन चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्याचे दिसून आले. ३.३२ वाजता सायरन वाजल्याने चोरटे पळाल्याचे समोर आले.

Web Title: The attempt to break the bank failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.