बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष

By Admin | Updated: July 10, 2014 00:43 IST2014-07-10T00:16:33+5:302014-07-10T00:43:46+5:30

परभणी आषाढी एकादशीनिमित्त गोपाळदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी या गोपाळदिंडीमध्ये सहभाग नोंदविला.

Attacks by the child warchers | बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष

बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष

परभणी
आषाढी एकादशीनिमित्त गोपाळदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी या गोपाळदिंडीमध्ये सहभाग नोंदविला. विविध पारंपारिक वेशभूषेतील सजीव देखाव्यांनी गोपाळदिंडी सर्वांचे आकर्षण ठरत होती. विश्व हिंदू परिषद, संजिवनी मित्र मंडळाने बालगोपाळांच्या दिंडीचे आयोजन केले होते. दिंड्यांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते.
गुजरी बाजार व्यापाऱ्यांकडून स्वागत
आषाढी एकादशीनिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे काढलेल्या बालगोपाळ दिंडीचे स्वागत गुजरी बाजार व्यापारी मित्रमंडळाने केले.
गुजरी बाजार येथे श्री विठ्ठल प्रतिमेचे पूजन महापौर प्रताप देशमुख व बालाजी मंदिरचे महंत रघुनाथ बाबाजी यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी रिंगण सोहळा, डॉ. संजय टाकळकर, महापौर प्रताप देशमुख यांनी सादर केला. सर्व बालवारकऱ्यांना गुजरी बाजार व्यापारी मंडळीतर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, नितीन वट्टमवार, रमेश पेकम, वैष्य समाजाने अध्यक्ष सुधीर पाटील, बंडू पाचलिंग आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी प्रल्हाद पोहडूंळकर, रमेश पेकम, हनुमान कालानी, मुन्नासेठ अग्रवाल, उमेश पाचलिंग, प्रभाकर टाक, उदय जैन, नारवाणी, रमेश सराफ, अनिल जैन, अनुप जैन आदींनी परिश्रम घेतले.
वासवी लाडूचे वाटप
वासवी क्लबच्या वतीने बाल-गोपाळ दिंडीला लाडूचे वाटप केले. या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष राजेश कत्रुवार, सचिव नागेश निलावार, विनायक फुटाणे, सुरेश कत्रुवार, डॉ.किरण कमुटला, मिलिंद डुब्बेवार, डॉ.पंजक ढमढेरे, किरण कोकडवार, बालाजी डुब्बेवार, संदीप गुंडावार, शैलेश वट्टमवार, व्यंकटेश कोडगीरवार, विश्वंभर पत्तेवार, स्वप्नील अर्थमवार, शिवकुमार मालसेटवार, मालेवार आदींची उपस्थिती होती.
सजीव देखावे, रिंगण सोहळाही रंगला
शहरातून निघालेल्या या दिंड्यामध्ये मराठवाडा हायस्कूल, वसंतराव नाईक विद्यालय, उद्देश्वर विद्यालय, प्रभावती विद्यालय, अक्षरज्योती विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, आकाशकन्या विद्यालय, बालविद्यामंदिर, भारतीय बालविद्यामंदिर आदी शाळांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. माळीगल्लीतील हनुमान मंदिरातून या दिंड्यांना प्रारंभ झाला. सुधीर पाटील यांनी सपत्नीक पूजा केल्यानंतर दिंड्या मार्गस्थ झाल्या. बाळासाहेब घिके यांची उपस्थिती होती. दिंड्यामधील भारतीय बाल विद्यामंदिरचे लेझिम पथक व अक्षरज्योतीचे बॅन्ड पथक सर्वांचे आकर्षण ठरले होते.
मराठवाडा हायस्कूलने ‘रेड्या मुखी वेद’ हा सजीव देखावा सादर केला. या दिंड्यामध्ये शाळांनी वेगवेगळे देखावे सुरेख पद्धतीने साकारले होते. गुजरी बाजारात डॉ. संजय टाकळकर यांच्या घोड्याचे रिंगण झाले. वनिता वासवी क्लब, गुजरी बाजार मित्रमंडळ, भगवान भोजनानी, बाळासाहेब घिके यांच्या वतीने दिंडीतील सहभागी बालकांना फराळाचे वाटप करण्यात आले. महापौर प्रताप देशमुख, डॉ. संजय टाकळकर, अनिल आष्टुरकर यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडीसाठी विश्व हिंदू परिषदेचे अनंत पांडे, शिवप्रसाद कोरे, प्रकाश लाखरा, मनोहर शहाणे, सुनिल रामपूरकर, प्रल्हादराव कानडे, नारायण गरुड, गोपाळ रोडे, श्यामसुंदर शहाणे, श्यामसुंदर कुलकर्णी, कैलास पारीख, गजानन नळगे, लक्ष्मीकांत क्षीरसागर, गणेश काळबांडे, अभिजित कुलकर्णी, प्रशांत ढापणे, माधव खुणे आदींनी परिश्रम घेतले.
दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त स्रेहनगर येथे श्रींना महाभिषेक व महाआरती करण्यात आली. नितीन जाधव यांनी हा अभिषेक केला. यावेळी मंठेकर, सखाराम जोशी, दिलीेप डहाळे, रामराव जाधव, विजय पिंपरीकर, अनंतराव देशमुख, यशवंत बोरीकर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अमित यस्के, गजानन वनभूजरे, सोहम बोरीकर, माऊली जाधव यांनी परिश्रम घेतले.
संजीवनीच्या दिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद
संजीवनी मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे उपसभापती आनंद भरोसे यांनी आयोजित केलेल्या बालगोपाळ दिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील १८ शाळांमधील पाच - सहा हजार विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा नागरिकांचे आकर्षण ठरले.
दिंडीमध्ये लेझीम पथकाने विविध प्रात्याक्षिके सादर केली. एकता कॉलनीतील गांधी विद्यालयातून दिंडीला प्रारंभ झाला. वसमतरोडवरील संत तुकाराम महाविद्यालयात समारोप झाला. संत तुकाराम महाविद्यालयात विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रांगणातच अश्वरिंगण, गौळण, फुगडी, भारुड, भजन, हरिपाठ सादर करण्यात आले. या दिंडीमधून विद्यार्थ्यांनी संत नामदेव महाराजांच्या देखाव्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. तसेच विठ्ठल-रुख्मिणीचा सजीव देखावा तयार करण्यात आला होता. या देखाव्याने नागरिकांचे लक्ष वेधले. दिंडीच्या माध्यमातून जय जवान, जय किसान, जय विज्ञान, एकच नारा घरोघरी, झाडे लावा दारोदारी, जल है तो कल है, असे संदेश देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद माध्यमिक विद्यालय, गांधी विद्यालय, छत्रपती शाहू विद्यालय, विवेकानंद इंग्लिश स्कूल, कै. मुंजाजी विठ्ठलराव शिंदे विद्यामंदिर, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
(प्रतिनिधी)
गांधी विद्यालय प्रथम
या दिंडीमध्ये उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या गांधी विद्यालय एकतानगर शाळेने ३००१ रुपयाचे प्रथम पारितोषिक पटकाविले. छत्रपती शाहू विद्यालयाच्या देखाव्याने २००१ रुपयाचे द्वितीय तर विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या देखाव्याला १००१ रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले. संजीवनी मित्र मंडळाचे अध्यक्ष आनंद भरोसे, नगरसेवक शिवाजीराव भरोसे, नेहरु एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बळीराम मस्के, दीपाताई रिझवानी, सूर्यकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरित करण्यात आले.

Web Title: Attacks by the child warchers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.