कोराळीत बिबट्याचा गायीवर हल्ला

By Admin | Updated: March 24, 2016 00:44 IST2016-03-24T00:31:56+5:302016-03-24T00:44:49+5:30

अंबुलगा (बु.) : निलंगा तालुक्यातील कोराळी येथील एका शेतकऱ्याची शेतीत दावणीला बांधलेल्या गाईवर बिबट्याने बुधवारी पहाटे हल्ला करत चक्क लचके तोडले आहेत

Attacking a crippled caul in Koral | कोराळीत बिबट्याचा गायीवर हल्ला

कोराळीत बिबट्याचा गायीवर हल्ला

अंबुलगा (बु.) : निलंगा तालुक्यातील कोराळी येथील एका शेतकऱ्याची शेतीत दावणीला बांधलेल्या गाईवर बिबट्याने बुधवारी पहाटे हल्ला करत चक्क लचके तोडले आहेत. यात गाय गंभीर जखमी झाली असून, शेतकऱ्यांसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
निलंगा तालुक्यातील कोराळी येथील शेतकरी प्रताप आकडे यांनी आपल्या शेतात दावणीला बांधलेल्या गायीवर बिबट्याने बुधवारी पहाटे ५ वाजता हल्ला केला. या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली असून, बिबट्याने गायीचे लचकेच तोडत तो गावलगतच्या झाडीत पसार झाला. सध्या जखमी गायीवर पशु वैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत. याप्रकरणी लातूर वनविभागाला सरपंच कल्पना गायकवाड यांनी माहिती दिली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी कोरळी येथे वनविभागाचे ३२ कर्मचारी दाखल झाले आहेत.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पाहणी करुन पंचनामा केला असता बिबट्याची विष्ठा आणि ठसे आढळून आले आहेत. गायीवर हल्ला करुन पळालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे बुधवारी दिवसभर प्रयत्न सुरु होते. यासाठी दोन पिंजऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र प्रयत्न करूनही बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले नाही. तरीही वनविभागाचे प्रयत्न सुरू होते.

Web Title: Attacking a crippled caul in Koral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.