कौटुंबिक वादातून नातेवाइकाच्या घरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:05 IST2021-06-26T04:05:12+5:302021-06-26T04:05:12+5:30

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार साहेबराव बन्सी राठोड आणि आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. गिरनेर तांडा येथे त्यांचे मूळ गाव ...

Attack on a relative's home over a family dispute | कौटुंबिक वादातून नातेवाइकाच्या घरावर हल्ला

कौटुंबिक वादातून नातेवाइकाच्या घरावर हल्ला

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार साहेबराव बन्सी राठोड आणि आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. गिरनेर तांडा येथे त्यांचे मूळ गाव आहे. २३ जून रोजी जुन्या वादातून त्यांच्यात भांडण झाले होते. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात तक्रार नोंद आहे. तेव्हापासून तक्रारदार आणि आरोपी यांच्या कुटुंबात धुसफुस सुरू होती. २४ जून रोजी सकाळी ९ वाजता साहेबराव , त्यांची पत्नी, मुलगा शुभम आणि मेहुणा पंडित नरसिंग चव्हाण हे त्यांच्या संतोषीमातानगर येथील घरी होते. तेव्हा आरोपी अचानक तेथे आले आणि त्यांनी शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी गल्लीतील लोकांनी भांडण सोडवत आरोपींना घराबाहेर काढले आणि साहेबराव यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून घेतली. यानंतर आरोपींनी घराच्या मागील बाजूने आरोपी अनिल, पोपट आणि बबलू हे दांडे हातात घेऊन गच्चीवर चढले आणि जिन्यावाटे घरात शिरले. यावेळी त्यांनी सर्वांना दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेविषयी साहेबराव यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली.

Web Title: Attack on a relative's home over a family dispute