एटीएसचे वरिष्ठ शहरात

By Admin | Updated: July 26, 2016 00:12 IST2016-07-26T00:06:05+5:302016-07-26T00:12:08+5:30

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी परभणी येथून अटक करण्यात आलेल्या इसिस समर्थक अतिरेक्याकडून स्फोटकाचा साठा जप्त करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

In ATS senior cities | एटीएसचे वरिष्ठ शहरात

एटीएसचे वरिष्ठ शहरात

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी परभणी येथून अटक करण्यात आलेल्या इसिस समर्थक अतिरेक्याकडून स्फोटकाचा साठा जप्त करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. मराठवाड्यातून इसिसशी संबंधित अटक करण्यात आलेला हा दुसरा संशयित अतिरेकी आहे. याबाबतची माहिती मिळताच महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील खोले यांच्यासह अन्य अधिकारी सोमवारी दिवसभर औरंगाबादेत तळ ठोकून आहेत
याविषयी एटीएसच्या खास सूत्राने सांगितले की, परभणी येथील नासेरबीन अबुबकर याफई (चाऊस)यास १३ जुलै रोजी एटीएसने उचलले. पोलीस चौकशीत त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने बॉम्ब तयार केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी पुन्हा परभणीतून नासेरबीनचा साथीदार शाहिद खान यास उचलले. त्याच्याकडून आयईडी या अत्यंत घातक स्फोटकाचा साठा आणि डिटोनेटर्स जप्त केले. दोन्ही आरोपी हे सिरियातील इसिस या दहशतवादी संघटनेच्या फारूखसोबत इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात होते. मराठवाड्यातील सुमारे शंभर तरुण इसिसच्या संपर्कात असल्याचे आणि हे तरुण एटीएसच्या रडारवर असल्याची माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी प्रसारमाध्यमाला सांगितले आहे. मराठवाड्यातील सर्वाधिक तरुण इसिसच्या संपर्कात असल्याने पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर या तरुणांना शोधून काढण्यासाठी एटीएसने आता तयारी सुरू केली आहे. पुढील व्यूहरचना निश्चित करण्यासाठी एटीएसचे वरिष्ठ अधिकारी सुनील खोले यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकारी औरंगाबादेतील कार्यालयात सोमवारी तळ ठोकून होते.

Web Title: In ATS senior cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.