मतिमंद मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:11 IST2017-08-19T00:11:17+5:302017-08-19T00:11:17+5:30

तालुक्यातील खांबाळा येथील एका मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध १८ आॅगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 Atrocities on the minded girl | मतिमंद मुलीवर अत्याचार

मतिमंद मुलीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील खांबाळा येथील एका मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध १८ आॅगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
घरात कोणी नसल्याचे पाहून हिंगोली तालुक्यातील खांबाळा येथील मतिमंद मुलीवर १६ आॅगस्ट रोजी एक नराधमाने अत्याचार केला. पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. परंतु ते घरी परतल्यावर घडलेला प्रकार उघडकीस आला. शिवाय पीडित मुलीच्या नातेवाईकांना पोलिसांत तक्रार देऊ नकोस, अशा धमक्याही आरोपीकडून येत असल्याचे सांगण्यात आले. परंतु पिडित मुलीच्या आईने १८ आॅगस्ट रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून आरोपी राजू पठाडे रा. खांबाळा याच्याविरूद्ध तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल करणे सुरू आहे.

Web Title:  Atrocities on the minded girl