अल्पवयीन मुलीवर वाढवण्यात अत्याचार
By Admin | Updated: January 30, 2015 00:50 IST2015-01-30T00:41:17+5:302015-01-30T00:50:18+5:30
वाढवणा (बु.) : उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील एका अल्पवीयन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून लैैंगिक अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे़

अल्पवयीन मुलीवर वाढवण्यात अत्याचार
वाढवणा (बु.) : उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील एका अल्पवीयन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून लैैंगिक अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे़ याप्रकरणी दोघांवर वाढवणा पोलिसांत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
वाढवणा येथे राहणाऱ्या एका १७ वर्ष अल्पवयीन मुलीस गावातीलच आरोपी सचिन शेषेराव सारोळे याने लग्नाचे आमिष दाखवून मागील दोन वर्षांपासून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला़ या गुन्ह्यात आरोपी सचिनला केवळबाई तुकाराम सारोळे हिनेही मदत केल्याचे पीडित मुलीने बुधवारी वाढवणा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे़ तसेच हा प्रकार बाहेर कोणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही सचिन सारोळे याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ त्यानुसार आरोपी सचिन व केवळबाई सारोळे यांच्याविरुद्ध बुधवारी रात्री कलम ३७६ (एन), ५०६, ३४ व २०१२ च्या बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती वाढवणा पोलिसांनी दिली़ या घटनेचा पुढील तपास सपोनि़ लक्ष्मण राख हे करीत आहेत़ (वार्ताहर)