जेवणात गुंगीचे औषध टाकून महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:50 IST2017-09-11T00:50:03+5:302017-09-11T00:50:03+5:30
खुशालसिंगनगर भागात एका भोजनालयात महिलेच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली़ याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन विमातनळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़

जेवणात गुंगीचे औषध टाकून महिलेवर अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: खुशालसिंगनगर भागात एका भोजनालयात महिलेच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली़ याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन विमातनळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़
खुशालसिंगनगर भागातील एका महिलेचे विद्युतनगर भागात भोजनालय आहे़ या ठिकाणी नऊ महिन्यांपूर्वी आरोपी आला होता़ यावेळी आरोपीने महिलेच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून त्यांच्यावर अत्याचार केला़
त्यानंतर मोबाईलमध्ये त्याची चित्रफित तयार केली़ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानंतरही आरोपीने बळजबरीने महिलेसोबत संबंध ठेवले़ याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी पीडित महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला़ प्रकरणाचा तपास पोउपनि शेख करीत आहेत़
दुसºया एका घटनेत, इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते़ आरोपी तरुणीला निजामाबाद येथे घेऊन गेला होता़ त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला़
याबाबत पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़