शहरं
Join us  
Trending Stories
1
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
2
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
3
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
4
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
5
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
6
अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
7
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
8
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
9
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
10
काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
11
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
12
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
13
"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
14
Nashik Municipal Election 2026 : कुंभ पर्वातील वचनात शाश्वत विकासाची ग्वाही; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
15
WPL 2026 Opening Ceremony : हरमनप्रीत अन् स्मृती मैदानात उतरण्याआधी या बॉलिवूडकरांचा दिसणार जलवा
16
'लाडक्या बहिणीं'साठी स्टार प्रचारकही मैदानात, महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक
17
पगारवाढ हवी असेल तर ऑफिसला यावंच लागेल; TCS चा कडक पवित्रा, 'WFO' अटेंडन्स पूर्ण नसल्यास अप्रेझल रखडणार
18
Social Viral: कोण म्हणतं पाणीपुरी विकणं छोटं काम आहे? तापसीने करून दाखवलं 'वर्ल्ड रेकॉर्ड'
19
'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका
20
२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख
Daily Top 2Weekly Top 5

आठवलेंच्या रिपाइंचा मोठा निर्णय; छत्रपती संभाजीनगरात भाजपविरोधात वंचित, शिंदेसेनेस पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:24 IST

आठवलेंनीदेखील भाजपसोबत राहू नये; प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम

छत्रपती संभाजीनगर : भाजपसोबत युती असतानाही महापालिका निवडणुकीत रिपाइं (आठवले) ला जागा सोडल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर युती तोडून भाजपविरुद्ध ज्या प्रभागात शिंदेसेना किंवा वंचित बहुजन आघाडीचा सशक्त उमेदवार असेल, त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रविवारी घेतला, असे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी सांगितले.

भाजपने छत्रपती संभाजीनगरच नव्हे, तर राज्यभरात कुठेही रिपाइंला जागा सोडल्या नाहीत. महापालिका निवडणुकीत जर भाजपचा असा पवित्रा असेल, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वेगळे काय असू शकेल. त्यामुळे कालच्या बैठकीत एकमताने भाजपसोबत न राहण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत प्रचाराचा नारळ फोडला, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता कदम म्हणाले, भाजपसोबतची युती तोडावी, यासाठी रामदास आठवले यांच्यावर राज्य कार्यकारिणी लवकरच दबाव आणणार आहे. भाजपच्या युतीसंदर्भात समाजामध्ये वेगळा मेसेज गेला आहे. त्यामुळे आम्ही आता भाजपसोबत राहणार नाही.

एकदाही चर्चेस बोलावले नाहीआम्ही स्थानिक पातळीवर १५ जागांचा प्रस्ताव भाजपला दिला होता. परंतु, त्यांनी एकदाही आम्हाला चर्चेसाठी बोलावले नाही, शेवटपर्यंत त्यांचा कुणाचाही फोन आला नाही. त्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही भाजपविरोधी भूमिका घेतली असून ‘एमआयएम’ वगळून प्रबळ असलेल्या शिंदेसेना किंवा ‘वंचित’च्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरणार आहोत.

बजाजनगरमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत मिलिंद शेळके, किशोर थोरात, संजय ठोकळ, विजय मगरे, बाळकृष्ण इंगळे, राकेश पंडित, अरविंद अवसरमल, दिलीप पाडमुख आदींसह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : RPI breaks with BJP, supports VBA, Shinde Sena in Aurangabad.

Web Summary : RPI (Athawale) ended its alliance with BJP in Aurangabad after seat disagreements. It will support the Shinde Sena or VBA candidates in the municipal elections. The party will pressure Ramdas Athawale to end the alliance statewide, citing betrayal and lack of consultation by BJP.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपा