शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नारेगाव येथील ४० वर्षांपासून पडून ३ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया, आणखी ७ मे. टन बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:16 IST

छत्रपती संभाजीनगरात नारेगाव येथे दहा लाख मेट्रिक टन तर चिकलठाणा, हर्सूल व पडेगाव येथे किमान पाच लाख मेट्रिक टन कचरा पडून आहे

छत्रपती संभाजीनगर : नारेगाव येथे मागील ४० वर्षांपासून टाकण्यात येणारा कचराप्रक्रिया न करता तसाच पडून होता. या कचऱ्यावर ६८ कोटी रुपये खर्च करून प्रक्रिया करण्यात येत आहे. आतापर्यंत तब्बल ३ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. या कचऱ्यातील प्लॅस्टिकला सिमेंट कंपन्यांमध्ये पाठविले जात आहे. कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताला शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे.

नारेगाव येथील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी म्हणून शासनाने मनपाला ६६ कोटींचा निधी दिला. त्यानुसार महापालिकेने जीएनआय कंपनीला अन्य एका कंपनीसोबत जाईंटव्हेंचरमध्ये काम सोपविले. त्यासाठी सुमारे ६८ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. दि. ३० सप्टेंबर २०२४ पासून बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. एप्रिलअखेरपर्यंत येथील संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आदेश उपायुक्त विजय पाटील यांनी दिले. ४५० व ३५० मेट्रिक टनाच्या दोन मशीन नारेगाव येथे बसविण्यात आल्या.

हर्सूल, पडेगाव आणि चिकलठाणा येथेही कचराप्रक्रिया केंद्राच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. या कचऱ्यावरही प्रक्रिया केली जाणार आहे. अगोदर पडेगाव येथील कचरा कसा कमी होईल, यादृष्टीने एक मशीन बसवून काम करण्यात येत आहे. लवकरच हर्सूल, चिकलठाण्यात हे काम सुरु होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

१५ लाख टन कचरा पडूनशासनाने महापालिकेला नारेगाव येथील दहा लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. चिकलठाणा व हर्सूल, पडेगाव येथे किमान पाच लाख मेट्रिक टन कचरा पडून आहे. त्यामुळे शासनाला आणखी पाच लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निधी मिळावा, अशी विनंती केली जाणार आहे.

कचऱ्यापासून सोनेकचऱ्यातून निघणाऱ्या प्लॅस्टिकला सिमेंट कंपन्यांकडून मोठी मागणी आहे. राज्यातील चंद्रपूर, कर्नाटक, छत्तीसगड मधील दुर्ग व रायपूर येथे प्लॅस्टिक कचरा पाठविला जात आहे. कचऱ्यापासून तयार हाेणाऱ्या खताला शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका