सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अद्याप फरार
By Admin | Updated: March 14, 2016 00:37 IST2016-03-14T00:27:28+5:302016-03-14T00:37:36+5:30
उस्मानाबाद : उस्मानाबाद आगारातील मेकॅनिकलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पी़व्हीक़ुलकर्णी

सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अद्याप फरार
उस्मानाबाद : उस्मानाबाद आगारातील मेकॅनिकलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पी़व्हीक़ुलकर्णी हे घटनेच्या १२ व्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पोलिसांना सापडले नाहीत़ ते अद्याप फरार असल्याचे सांगण्यात आले.
उस्मानाबाद आगारात मेकॅनिक म्हणून काम करणारे दिलीप सोनटक्के यांनी २ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास आगारातील बसमध्ये आत्महत्या केली होती़ मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पी़व्हीक़ुलकर्णी, चार्जमन तुळशीराम जमादार, प्रमुख कारागिर मधुकर मारूती वनवे, महेश देविदास कुलकर्णी, कमलाबाई नामदेव गायकवाड यांच्याविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलिसांनी तुळशीराम जमादार, मधुकर वनवे व कमलाबाई गायकवाड, महेश कुलकर्णी यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते़ त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती़ पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ दरम्यान, दिलीप सोनटक्के यांनी आत्महत्या केल्यापासून फरार असलेले सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पी़व्हीक़ुलकर्णी घटनेच्या १३ व्या दिवशीही पोलिसांच्या हाती लागले नव्हते़ घटनेपासून रविवारी रात्री उशिरापर्यंत कुलकर्णी हे फरार होते़