चिकन विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

By | Updated: December 4, 2020 04:00 IST2020-12-04T04:00:06+5:302020-12-04T04:00:06+5:30

मोहम्मद फिरोज अब्दुल हमीद कुरेशी (२१, रा. चिस्तिया कॉलनी), असे जखमीचे नाव आहे. आरोपी सोहेल लियाकत कुरेशी, त्यांचा ...

Assault on a chicken seller | चिकन विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

चिकन विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

मोहम्मद फिरोज अब्दुल हमीद कुरेशी (२१, रा. चिस्तिया कॉलनी), असे जखमीचे नाव आहे. आरोपी सोहेल लियाकत कुरेशी, त्यांचा भाचा सोहेल कुरेशी आणि नन्हा कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत. जखमी मोहम्मद फिरोज आणि आरोपी यांचे मुकुंदवाडी येथे शेजारी दुकान आहे. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास फिरोज आणि अन्य एक जण घरी जात असताना त्यांना एपीआय कॉर्नर येथे आरोपींनी अडवून चिकन कमी दराने का विकतो, असे विचारून अचानक लोखंडी रॉड, दांडा आणि दगड मारून जखमी केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या फिरोजला सोडून आरोपी पळून गेले. जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद इंगळे आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब कोपनर

तपास करीत आहेत.

Web Title: Assault on a chicken seller