तलाठ्यास मारहाण
By Admin | Updated: May 23, 2015 00:37 IST2015-05-23T00:21:23+5:302015-05-23T00:37:53+5:30
वडीगोद्री : अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्यास वाळू माफियांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी गोंदी (ता अंबड ) येथे घडली.

तलाठ्यास मारहाण
वडीगोद्री : अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्यास वाळू माफियांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी गोंदी (ता अंबड ) येथे घडली.
गोंदी येथील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास या ठिकाणी वाळू वाहतूक होत असल्याने तलाठी अशोक काशीद यांनी वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले. चालकास पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर घेऊन चला असे सांगितले असता, काकासाहेब अर्जुन सोळूंके व अरुण सोळुंके या दोघांनी तलाठी काशीद यांना मारहाण केली. व ट्रॅक्टर घेऊन पळून गेले. या प्रकरणी गोंदी ठाण्यात काकासाहेब सोळुंके व अरूण सोळुंके विरूद्ध मारहाण, शासकीय कामात अडथळा व वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हे. कॉ. दासर हे करीत असल्याचे ठाणे अंमलदार विष्णू चव्हाण यांनी सांगितले.