तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना पाठलाग करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:05 IST2021-03-09T04:05:57+5:302021-03-09T04:05:57+5:30
करण मारोती गायकवाड (रा. शिवाजी कॉलनी वडगाव कोल्हाटी ) आणि आकाश ऊर्फ अक्षय देवानंद जाधव अशी आरोपींची नावे आहेत. ...

तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना पाठलाग करून पकडले
करण मारोती गायकवाड (रा. शिवाजी कॉलनी वडगाव कोल्हाटी ) आणि आकाश ऊर्फ अक्षय देवानंद जाधव अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गणेश राऊत आणि अन्य कर्मचारी ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गंगापूर तालुक्यातील शिंदेवाडी शिवारात गस्तीवर असताना मुख्य रस्त्यापासून सुमारे ३०० ते ४०० फूट अंतरावर दोन तरुण एकाला मारहाण करीत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी वाहन थांबवून कोण आहे आणि काय करीत आहात, असे आवाज देऊन विचारले असता दोन आरोपी पळून जाऊ लागले. अजय राजू दहातोंडे हा गंभीर जखमी अवस्थेत दिसला. पोलिसांनी लगेच स्थानिक पोलिसांना बोलावून जखमीला खासगी रुग्णालयात हलविले. यावेळी पळून जाणाऱ्या आरोपींचा चार किलोमीटर पाठलाग करून पकडले.