शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

सोयीच्या प्रभागासाठी इच्छुकांची कसरत; महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 8:03 PM

Aurangabad Municipal Corporation Election: प्रभाग पद्धतीत आपला वॉर्ड आसपासच्या कोणत्या दोन वॉर्डांशी जोडला जाईल, यावर इच्छुक उमेदवार तर्कवितर्क लावत आहेत.

ठळक मुद्देराज्य शासनाने जुनी वॉर्ड पद्धत रद्द करून प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून चातकाप्रमाणे निवडणुकीची वाट पाहणाऱ्या राजकीय मंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने ५ ऑक्टोबर रोजी राज्यातील काही महापालिकांना नवीन प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. औरंगाबाद महापालिकेने ( Aurangabad Municipal Corporation Election ) अद्याप कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यास सुरुवात केली नाही. मात्र, राजकीय मंडळींनी आतापासूनच सोयीचे प्रभाग येऊ शकतील का, यादृष्टीने जोरदार चाचपणी सुरू केली असून, प्रशासनानेही सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केली. दिग्गज उमेदवारांनी आपल्या सोयीचा प्रभाग कसा होईल, यासंदर्भात जोरबैठका सुरू केल्या आहेत.

एप्रिल २०१९ मध्ये महापालिकेची मुदत संपली. कोरोना संसर्ग आणि वॉर्ड आरक्षणाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या. कोरोनाचा संसर्ग बराच कमी झाला आहे. त्यातच राज्य शासनाने जुनी वॉर्ड पद्धत रद्द करून प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून चातकाप्रमाणे निवडणुकीची वाट पाहणाऱ्या राजकीय मंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रभाग पद्धतीत आपला वॉर्ड आसपासच्या कोणत्या दोन वॉर्डांशी जोडला जाईल, यावर इच्छुक उमेदवार तर्कवितर्क लावत आहेत. माजी नगरसेवकांनी तर आपल्या स्वप्नातील प्रभागही तयार करून टाकले आहेत. आपल्या सोयीनुसार शेजारचे दोन वॉर्ड जोडून कामालाही सुरुवात केली. प्रभागात आपल्याच पक्षाचे दोन सहकारी उमेदवार कोण असू शकतात, यावरही इच्छुकांनी शिक्कामोर्तब करून टाकले. त्यामुळे पक्षनेत्यांना उमेदवार निवडण्याचा ताणही कमी झाला. काही राजकीय मंडळी संभाव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध नागरी प्रश्न घेऊन महापालिका मुख्यालयावर आंदोलनेही करीत आहेत. इच्छुक उमेदवार मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागले असले तरी मनपा प्रशासन अजून ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे.

कच्चा आराखडा तयार होणार; पण...महापालिका प्रशासन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कच्चा प्रभाग आराखडा तयार करणार आहे. मात्र, हे काम कधी होईल हे जाहीर केलेले नाही. कारण, शहरातील दिग्गज उमेदवार, इच्छुक उमेदवार आम्हांला सोयीनुसार प्रभाग तयार करून द्या, अशी गळ घालतील. तेव्हा प्रशासनाला कात्रीत सापडल्यासारखे होईल, त्यामुळे हे काम अत्यंत गोपनीय पद्धतीनेच करण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केला आहे.२०१५ मधील पक्षीय बलाबलशिवसेना- २९भाजपा- २३एमआयएम- २४काँग्रेस- ११बहुजन समाज पार्टी- ०५नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- ०४रिपाइं (डेमोक्रॅटीक)- ०२अपक्ष- १७एकूण - ११५

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक