शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता विचारून सेवानिवृत्त शिक्षिकेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

By राम शिनगारे | Updated: May 5, 2023 21:20 IST

उस्मानपुऱ्यातील घटना : जयभवानीनगरमध्ये शतपावली करणे पडले महागात

छत्रपती संभाजीनगर : पहाटे सहा वाजेच्या सुमारास उस्मापुऱ्यातील देवानगरीत मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला एका भामट्याने बीड बायपासकडे कोणता रस्ता जातो, असे विचारले. महिलेने माहिती देताच त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. तर गुरुवारी रात्री जयभवानीनगरमध्ये जेवणानंतर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून चोरट्याने पोबारा केला. या प्रकरणी उस्मानपुरा व मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवला.

अलका विलास मोहरील (६१, रा. अवधूत अपार्टमेंट, देवानगरी) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. ५ मे रोजी पहाटे त्या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या. साडेपाच ते पावणेसहा वाजेच्या सुमारास त्या देवानगरीतील मेन रोडवर वॉक करीत असताना दुचाकीस्वार दोन चोरटे त्यांच्याजवळ गेले. त्यांनी बीड बायपासकडे जाणारा रस्ता कोणता, असे विचारून अलका यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर लगेचच एकाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले. त्यावर दोघांनीही तेथून पोबारा केला. या प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक रतन डोईफोडे करीत आहेत.

जयभवानीनगमध्ये दोन ग्रॅमचा तुकडा पळवलाज्योती उगले (रा. जयभवानीनगर) या एका फायनान्स कंपनीत नोकरीला आहेत. ४ मेच्या रात्री ९ वाजता जेवण केल्यानंतर त्या मावस बहीणीसोबत शतपावली करीत होत्या. त्यावेळी अंगात पिवळे जॅकेट व जिन्स पॅन्ट घातलेल्या चाेराने त्यांचा पाठलाग केला. गल्ली क्र. १ मध्ये गणपती मंदिराजवळ त्याने ज्योती यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली आणि जयभवानी चौकाच्या दिशेने पोबारा केला. त्याचा पाठलाग केला असता तो दिसून आला नाही. दरम्यान, घटनास्थळी सोन्याची चेन पडलेली दिसली. अंदाजे २ ग्रॅमचा तुकडा चोराच्या हाती लागला. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीAurangabadऔरंगाबाद