अस्मितादर्श साहित्य संमेलनाची जय्यत तयारी
By Admin | Updated: January 10, 2017 23:42 IST2017-01-10T23:38:24+5:302017-01-10T23:42:07+5:30
लातूर : दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात ३४ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन १४ व १५ जानेवारी रोजी होत आहे.

अस्मितादर्श साहित्य संमेलनाची जय्यत तयारी
लातूर : दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात ३४ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन १४ व १५ जानेवारी रोजी होत आहे. या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून, संमेलनस्थळाला ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गादेकर यांनी दिली.
गेल्या पाच दशकांपासून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे महाराष्ट्रात साहित्य चळवळ चालवीत आहेत. लातुरात पहिल्यांदाच प्रज्ञा दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन होत आहे. उद्घाटन अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार आहे. १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आंबेडकर पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान रॅली काढण्यात येणार आहे.
या रॅलीत विविध शाळा-महाविद्यालायातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. रॅलीचा समारोप संमेलनस्थळी होईल. त्यानंतर या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अॅड. निकम यांच्या हस्ते होईल. साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रा. सुधीर अनवले, प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, डॉ. अशोक नारनवरे, राजेंद्र लातूरकर, प्रा.यु. डी. गायकवाड, प्रा. युवराज धसवाडीकर, संजय घाडगे, डी. एस. नरसिंगे, प्रा. सविता किर्ते, रामराजे आत्राम, डॉ. विजय अजनीकर आदी परिश्रम घेत आहेत.(प्रतिनिधी)