आष्टीत गावठी पिस्तूल जप्त
By Admin | Updated: April 17, 2017 23:30 IST2017-04-17T23:28:12+5:302017-04-17T23:30:10+5:30
आष्टी : विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी पकडले

आष्टीत गावठी पिस्तूल जप्त
आष्टी : विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी येथील बसस्थानकासमोर पकडले. पिस्तूल जप्त केली असून त्याला अटक करण्यात आली.
तारासिंग करमसिंग गोहे (रा. वेताळवाडी ता. आष्टी) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडे गावठी पिस्तूल असून तो बसस्थानकासमोरील एका हॉटेलात थांबल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाल्यावरुन गुन्हे शाखेने सापळा लावला. त्याची झाडाझडती घेतली तेव्हा काडतूस असलेले गावठी बनावटीचे पिस्तूल आढळले. त्याच्याविरुद्ध पोहेकॉ मोहन क्षीरसागर यांनी ठाण्यात फिर्याद दिली. निरीक्षक दिनेश आहेर, पोना प्रसाद कदम, पोकॉ मोहन क्षीरसागर आदींनी ही कारवाई केली. (वार्ताहर)