शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा प्राध्यापक संपावर

By admin | Updated: August 23, 2014 00:45 IST

परभणी : जिल्ह्यातील आश्रमशाळेला जोडलेल्या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी वेतनाच्या मागणीसाठी २१ आॅगस्टपासून महाविद्यालये बंद करुन संप पुकारला आहे.

परभणी : जिल्ह्यातील आश्रमशाळेला जोडलेल्या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी वेतनाच्या मागणीसाठी २१ आॅगस्टपासून महाविद्यालये बंद करुन संप पुकारला आहे. राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २००८-०९ पासून १४७ कनिष्ठ महाविद्यालये आश्रमशाळांना जोडली आहेत. परंतु, या महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहा वर्षांपासून वेतन दिले गेले नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांना महाविद्यालयीन शिक्षण मिळावे, या उद्देशाने शासनाने ही कनिष्ठ महाविद्यालये आश्रमशाळेला जोडली. विशेष म्हणजे आश्रमशाळेतील वसतिगृह चालविण्यासाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्षात काम करणाऱ्या प्राध्यापकांना सहा वर्षांपासून वेतन दिले गेले नाही. या संदर्भात शिक्षक आमदार, आश्रमशाळा संघटना, कनिष्ठ महाविद्यालयीन कृती समितीने वेळोवेळी पाठपुरावा केला. २१ जुलै रोजी आझाद मैदानावर कामबंद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्वरित वेतन देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत हे आश्वासन पाळले गेले नाही. त्यामुळे आता महाविद्यालयीन प्राध्यापकांनी जोपर्यंत वेतन मिळणार नाही, तो पर्यंत महाविद्यालयात जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. (प्रतिनिधी)परभणी जिल्ह्यात १० महाविद्यालयेआश्रमशाळांशी जोडलेली जिल्ह्यामध्ये दहा महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये ६० ते ६५ प्राध्यापक असून त्यांचे वेतन रखडले आहे. ही सर्व महाविद्यालये २१ आॅगस्टपासून बंद ठेवण्यात आली आहेत.शासनाने हे कनिष्ठ महाविद्यालये देताना वसतीगृह चालविण्यासाठी १०० टक्के अनुदानाची तरतूद केली आहे. परंतु, कर्मचाऱ्यांच्या अनुदानासाठी मात्र २०१२ पासून अनुक्रमे २५, ५०, ७५ व १०० टक्के अनुदानाची तरतूद शासन निर्णयात केली आहे. या कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी ७५ टक्के अनुदानास पात्र असतानाही त्यांना वेतन मिळालेले नाही.