शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

अशोक चव्हाण अचानक औरंगाबादेत, मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर ‘राजकीय चर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:50 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे आज सायंकाळी मुंबईहून औरंगाबादला आगमन झाले व मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी राजकीय चर्चा केली.

औरंगाबाद : राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे आज सायंकाळी मुंबईहून औरंगाबादला आगमन झाले व मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी राजकीय चर्चा केली.आमदार सुभाष झांबड, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी उपाध्यक्ष सुरेंद्र सोळुंके पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक सायन्ना, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, माजी नगरसेवक नारायणअण्णा सुरगोणीवार, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव मीनाक्षी बोर्डे-देशपांडे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, डॉ. पवन डोेंगरे, योगेश मसलगे पाटील, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष अनिल मालोदे, यशवंत कदम आदी मोजके कार्यकर्ते विमानतळावर दाखल झाले होते. ‘सुभाष झांबड हम तुम्हारे साथ है’ अशी साद चव्हाण यांनी घालताच झांबड यांनीही, हम भी तुम्हारे साथ है’ असा प्रतिसाद दिला.काही मोजक्या कार्यकर्त्यांना चर्चा करण्यासाठी सोबत घेऊन अशोक चव्हाण गाडीत बसले. अब्दुल सत्तार यांचा भाजपतील संभाव्य प्रवेश, त्याचे जिल्ह्याच्या राजकारणावर होणारे परिणाम, त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेतील काँगेसचे किती सदस्य जाऊ शकतील, सत्तारांना भाजप प्रवेशासाठी होत असलेला विरोध, यावर ही चर्चा झाली असल्याचे समजते.जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या अधिकाधिक सदस्यांना रोखण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यादृष्टीने चव्हाण यांची आजची छोटेखानी भेट महत्त्वाची ठरणार आहे.कोणत्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन आगामी विधानसभा निवडणुका न लढल्यास काही खरे नाही, असे मत अनेक पदाधिकारी विमातनळावर अशोक चव्हाण येण्यापूर्वी व्यक्त करीत होते. शिवाय राष्टÑवादी काँग्रेसचे इंदिरा काँग्रेसमध्ये लवकरात लवकर विलीनीकरण व्हावे, अन्यथा राष्टÑवादी काँग्रेसशी कायमची फारकत तरी घ्यावी, असेही मत काही पदाधिकारी व्यक्त करीत होते.नंतर चव्हाण कारने नांदेडकडे रवाना झाले. ते उद्या तिथे ईद मिलनच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण