आश्रमशाळेचा चौकीदार निलंबित
By Admin | Updated: March 17, 2016 00:11 IST2016-03-17T00:07:47+5:302016-03-17T00:11:50+5:30
किनवट: शासकीय आश्रमशाळेतील चौकीदार बी़ व्ही़ वडजे यांच्या निलंबनाचे आदेश सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी बुधवारी १६ मार्च रोजी पारित केले़

आश्रमशाळेचा चौकीदार निलंबित
किनवट: कर्तव्यावर असताना नशापाणी करुन वसतिगृहातील मुलांना शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील चौकीदार बी़ व्ही़ वडजे यांच्या निलंबनाचे आदेश सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी बुधवारी १६ मार्च रोजी पारित केले़
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यालयाअंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील एकघरी येथील शासकीय आश्रमशाळेत कार्यरत असलेले चौकीदार बी़ व्ही़ वडजे हे कर्तव्यावर असताना नशापाणी करुन वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या मुला-मुलींना शिवीगाळ, मारहाण करत असल्याच्या तक्रारी प्रकल्प कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या़ त्याची दखल घेत चौकशीअंती वडजे यांना निलंबीत करण्यात आले़ दरम्यान, याच शाळेतील मुख्याध्यापक एस़ एस़ खेकारे व पदविधर प्राथमिक शिक्षक बी़एऩ एमलवाड यांचीही विभागीय चौकशी करण्यात येवून शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश डॉ़ भारुड यांनी दिले आहेत़ मुख्याध्यापक खेकारे यांच्याविरुद्ध अनेक गंभीर प्रकारचे आरोप आहेत़ (वार्ताहर)