जिद्द, इमानदारी, अथक परिश्रमाचे प्रतीक आसाराम ‘काकाजी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:36 IST2017-10-03T00:36:11+5:302017-10-03T00:36:11+5:30
. जिद्द, इमानदारी आणि अथक परिश्रमाचे प्रतीक म्हणजेच आसाराम मुगदिया काकाजी होत’असे भावपूर्ण उद्गार आज येथे लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी काढले.

जिद्द, इमानदारी, अथक परिश्रमाचे प्रतीक आसाराम ‘काकाजी’
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘आसाराम मुगदिया हे गांधीजींच्या व काँग्रेसच्या विचारांनी प्रेरित झालेले नेतृत्व होते. आज गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करीत असताना काकाजी हे साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे किती मूर्तिमंत उदाहरण होते, हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. औरंगाबाद शहराच्या विकासाचा व रेल्वे रुंदीकरणासारख्या प्रश्नाचा ध्यास घेऊन त्यांनी राजकारण केले. ते तत्त्वशील होते. जिद्द, इमानदारी आणि अथक परिश्रमाचे प्रतीक म्हणजेच आसाराम मुगदिया काकाजी होत’असे भावपूर्ण उद्गार आज येथे लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी काढले.
चिकलठाणा एमआयडीसीत नम्रता ग्रुपच्या प्रांगणात आसाराम मुगदिया काकाजींच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण करताना ते बोलत होते.
थोरा-मोठ्यांच्या कुंडल्या
यानिमित्ताने सकाळपासूनच नम्रता ग्रुपच्या प्रांगणात सारे वातावरण काकाजींच्या आठवणींनी भारावून गेले होते. काकाजींचा जीवनपट एका चित्रप्रदर्शनीद्वारे उलगडण्यात आला होता. काकाजींना कुंडल्या पाहण्याचा छंद होता. त्यांनी पाहिलेल्या भगवान राम, भगवान महावीर स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, काँग्रेस स्थापना दिवस, लोकमान्य टिळक, पं. मदनमोहन मालवीय, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मेनका गांधी, संजय गांधी यांच्या हस्तलिखितांच्या कुंडल्याही त्याठिकाणी मांडण्यात आल्या होत्या. कौटुंबिक जीवनातील अनेक प्रसंगांची छायाचित्रेही लक्ष वेधून घेत होती.
आज गांधी जयंती. काकाजी गांधीवादीच होते. २ आॅक्टोबर १९९२ रोजी काकाजींनी या जगाचा निरोप घेतला. पण आज गांधीजींची व लालबहादूर शास्त्री यांची जयंती. या दिनाचे महत्त्व ओळखून यावेळी ‘वैष्णव जन तो तेणे कहिए’ हे भजन गाऊन राजेंद्र दर्डा, आमदार सुभाष झांबड व इतर मान्यवरांच्या हस्ते गांधीजींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राजेंद्र दर्डा यांनी सांगितले, लोकमतची औरंगाबादला सुरुवात करण्यापूर्वी मी अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मछली खडकवरील कमला क्लॉथमध्ये काकाजींची पहिली भेट झाली होती. त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी मला खूप भावली होती. काकाजींनी जिद्द, इमानदारी व कष्ट ही शिकवणूक दिली होती. याच बळावर आज मुगदिया परिवार प्रगती करीत आहे.
यावेळी आ. सुभाष झांबड म्हणाले, आसाराम मुगदिया काकाजी सच्चे गांधीवादी कार्यकर्ते होते. द्वारकादास पटेल आणि काकाजी या दोघांनी औरंगाबादच्या विकासाचे राजकारण केले. द्वारकादास पटेल यांच्या विचारसरणीत ते वाढलेले होते. काकाजींनी शेवटपर्यंत गांधी तत्त्वज्ञानाचा अंगीकार केला. तत्त्वाला सोडून त्यांनी कधीही राजकारण केले नाही. मीही त्यांच्याच तत्त्वज्ञानात घडलेला कार्यकर्ता आहे. माझ्या राजकारणाची प्रेरणा काकाजीच
होत.
काकाजी आणि झांबड परिवाराच्या नातेसंबंधांवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.
गायक नीलेश राणावत यांच्या सुमधुर आवाजातील ‘इतनी शक्ती हमे दे ना दाता, मनका विश्वास कमजोर हो ना’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बीना मुगदिया, संगीता गादिया, चेतना कर्नावत, साधना भंडारी आदीही काकाजींच्या आठवणीत हरवून गेल्या. ‘अद्भुत ऐसे जिन शासनको, वंदन वंदन, हजारो, लाखो, कोटी कोटी वंदन’ हे गीत गाऊन नीलेशने गुरुवंदन करून वातावरण भारावून टाकले.
या अभिवादन सभेस आमदार अतुल सावे, महापौर बापू घडमोडे, प्रमोद राठोड, महावीर पाटणी, जी. एम. बोथरा, डी. बी. कासलीवाल, विलास साहुजी, संजय संचेती, प्रकाश बाफना, दिगंबर क्षीरसागर, अॅड. भूषण पटेल, अरविंद माछर, चंपालाल खिंवसरा, मनसुख झांबड, तनसुख झांबड, मिठालाल कांकरिया, प्रकाश सिकची, राजा डोसी, ऋषभ कासलीवाल, विनोद बोकडिया, अनिल संचेती, नीलेश सावळकर, राजेश मुथा, विकास रायमाने, विनोद मंडलेचा, अनिल, सुनील धाडीवाल, जुगलकिशोर तापडिया, सुरेंद्र कुलकर्णी, राजू तनवाणी, बाळासाहेब संचेती, दीपक साहुजी, डॉ. सुशील भारुका, मदनलाल आच्छा, चांदमल सुराणा, वल्लभ बागला, अरुण मुनोत, सुनील देसरडा, आश्फाकसेठ, नरेंद्र जबिंदा, सोनू बग्गा, नितीन बगडिया, नंदू केलानी, किशोर कालडा, इंदर परसवाणी, संजू अग्रवाल, मनीषा भन्साली, नवीन जैन, पारस
छाजेड, सुरेश जैन, रतिसेठ मुगदिया, तेजूसेठ मुगदिया, प्रकाश मुगदिया, अरुण मुगदिया, धरमचंद मुगदिया, जवाहरलाल मुगदिया, प्रवीण मुगदिया, नितीन मुगदिया,
चंद्रेश मुगदिया, पंकज मुगदिया, मिलापचंद बोरोलिया, चंपालाल खिंवसरा, रवी खिंवसरा, कमलाबाई चंडालिया यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची अभिवादन सभेस उपस्थिती होती. रविसेठ मुगदिया यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.
नम्रपणे स्वागताला नकार...
४सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, कार्याध्यक्ष आ. सुभाष झांबड, उपाध्यक्ष विकास जैन, प्रशांत देसरडा, माजी आमदार किशनचंद तनवाणी आदींनी यावेळी होणारा स्वागताचा कार्यक्रम नाकारून खºया अर्थाने आसाराम काकाजींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सूत्रसंचालक डॉ. प्रकाश झांबड यांनी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. अनिल कोठारी, विपुल मुगदिया आदींनीही काकाजींच्या आठवणी सांगितल्या.