शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार पुलाखाली कोसळली; एकाचा मृत्यू, ५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 22:56 IST

चालकाचे अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

सिल्लोड/पालोद:  खेळणा नदीच्या पुलावरून भरधाव वेगाने जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून खाली कोसळली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील पाच प्रवासी गंभीर जखमी आहेत. हा अपघात जळगाव- सिल्लोड रस्त्यावर पालोद गावाजवळ असलेल्या पुलावर बुधवारी रात्री ९.१५ वाजता झाला.अजिनाथ रखमाजी सपकाळ(  २८ रा. पालोद ) असे मृत कार चालकाचे नाव आहे.  तर वैभव रतन साळवे २२ वय  रा.पालोद, आकाश कचरू गवळी २६ वय  रा.पालोद, ज्ञानेश्वर शेषराव काकडे २४ वय रा.पालोद ,

गंगाधर रामराव सुरडकर ३६ वय रा.पालोद, अजिनाथ फकीरराव सपकाळ ( ३८ वय रा.पालोद ) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. सुदैवाने नदीत पाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

सहाही जण कारमधून ( एम एच २२ यु ६४१४) सिल्लोडहून पालोदकडे येत होते.  अपघाताची माहिती मिळताच उपसरपंच मचिंद्र पालोदकर, भाजप युवा मोर्चाचे सुनील मिरकर, योगेश लांडगे, धनंजय पालोदकर, योगेश पालोदकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी कर्मचाऱ्यासहित घटनास्थळी भेट दिली. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. अनिरुद्ध गायकवाड आरोग्य कर्मचारी आशिष देवडे, परिचारिका हेमा कोळी, मनीषा वाघ, प्रियांका खराटे, शेख मुमताज, जहाज कामगार प्रदीप तुपे, चांद पटेल, माधवराव जाधव यांनी जखमींवर तत्काळ प्राथमिक उपचार केले.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू