शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे बंधूंची युती, मनसेला खिंडार; छ. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शिंदेसेनेत, शहराध्यक्ष भाजपत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:21 IST

पक्ष स्थापनेपासून सोबत असणाऱ्या सुमित खांबेकरांचा मनसेला 'जय महाराष्ट्र'

छत्रपती संभाजीनगर: राज्याच्या राजकारणात 'ठाकरे बंधू' (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र आल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि शहरात पक्षाचा मुख्य चेहरा असलेले सुमित खांबेकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. तर मनसे शहराध्यक्ष आशिष सुरडकर आणि गजन गौडा यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

स्थापनेपासूनची साथ सुटली! सुमित खांबेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. शहरात मनसेची बांधणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय मनसेसाठी मोठा फटका मानला जात आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

"शहरासाठी काम करायचंय!" सोशल मीडिया पोस्ट चर्चेत पक्षप्रवेशापूर्वी सुमित खांबेकर यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. "मला छत्रपती संभाजीनगरसाठी काम करायचं आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या मनातील खंत आणि पुढील वाटचाल स्पष्ट केली. केवळ पदासाठी नाही, तर शहराच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे संकेत त्यांनी यातून दिले आहेत.

मनसेला फटका, शिंदेसेनेची ताकद वाढलीछत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेची ताकद असलेल्या काही मोजक्या नेत्यांपैकी खांबेकर एक होते. त्यांनी पक्ष सोडल्याने मनसेच्या संघटनात्मक बांधणीला तडा गेला आहे. तर दुसरीकडे, मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून शिंदेसेनेने मनसेचा मोठा मोहरा आपल्याकडे खेचून आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपले पारडे जड केले आहे. ठाकरे बंधूंची युती आता छत्रपती संभाजीनगरमध्ये किती प्रभावी ठरते आणि खांबेकरांच्या जाण्याने पडलेली पोकळी मनसे कशी भरून काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : MNS leader defects to Shinde's Sena after Thackeray alliance news.

Web Summary : Amidst Thackeray reunion buzz, MNS Aurangabad chief Sumit Khambekar joined Shinde's Shiv Sena. A setback for MNS before elections; Khambekar cited city work as his reason.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटMNSमनसे