शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

जामिनावर सुटताच प्रियकर पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीसोबत पसार; मुलीने चिठ्ठीत लिहिले,'पुन्हा....'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:58 IST

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : एका २१ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेले. जानेवारीत त्याच्यावर बलात्कार, अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली. मात्र, जामिनावर सुटताच त्याने त्याच मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात सोमवारी करण चंद्रकांत तुरुकमाने (२१, रा. बालाजीनगर) याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला.

तक्रारदार महिला व तिचे पती नोकरी करतात. ३० सप्टेंबर रोजी सकाळी त्यांची मोठी मुलगी घरीच होती तर दोन मुले शाळेत गेले होते. सकाळी ९.३० वाजता शेजाऱ्यांनी त्यांची मुलगी हातात कपड्यांची बॅग व साडी नेसून निघून गेल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ महिलेला कॉल करून ही माहिती दिली. महिलेने काम सोडून घर गाठले. घरातून निघताना मुलीने सर्व शैक्षणिक कागदपत्रे नेले होते. मुलीला यापूर्वी देखील जानेवारीत करण याने पळवून नेले होते. तेव्हा पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार, अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी दोघांचा शोध घेत अटक केली होती.

पुन्हा तोंड दाखवणार नाही....तक्रारदार महिलेच्या मुलीने आईला उद्देशून चिठ्ठी लिहून ठेवत घर सोडले. त्यात ‘मम्मी माझ्याकडून मोठी चूक झाली. म्हणून मी यानंतर तुम्हाला कधीच तोंड दाखवणार नाही आणि मला शोधू पण नका. मी लग्न पण केलं आहे. झालं तर मला माफ करा’ अशी चिठ्ठी लिहिली. करण यानेच तिला पळवून नेल्याची शंका मुलीच्या आईने व्यक्त केली. तपास उपनिरीक्षक अर्जुन राऊत करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादKidnappingअपहरण