शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे विमान उडणार औरंगाबादेतून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 06:26 IST

३० कोटींची तरतूद : जुलै, आॅगस्टमध्ये होणार प्रयोग

औरंगाबाद : महाराष्ट्रात या वर्षी कमी-अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतर कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी राज्य शासनाने ३० कोटींची तरतूद केली आहे. वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत या प्रयोगासाठी विमानाचे उड्डाण औरंगाबाद येथून करणयाचे निश्चित झाले आहे. जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी मागविण्यात आलेल्या निविदा १३ जून रोजी उघडण्यात येणार आहेत. १५ जून रोजी कंत्राटदार कंपनीचा निर्णय होईल. १ जुलैपर्यंत औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात सी-बॅण्ड डॉपलर व रडार दाखल होणे शक्य आहे. येथील विमानतळावरून प्रयोगासाठी विमान उडेल. राज्याच्या सर्व ठिकाणांवरून ४५० कि़ मी. च्या अंतरात औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे येथूनच प्रयोग होण्याची शक्यता आहे.२०१५ रोजी औरंगाबाद आणि २०१७ मध्ये सोलापूर येथून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे प्रयत्न झाले. मात्र, त्यातून फारसा लाभ झाला नव्हता. असे असतानाही या वेळी शासनाकडे काही हवामानतज्ज्ञांनी प्रयोगासाठी रेटा लावला होता. चार वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगातून १५ ते २० टक्के जास्तीचा पाऊस पडला होता, असा दावा मदत व पुनवर्सन विभागाने केला होता. या वर्षीदेखील कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे ३० ते ४० टक्के पाऊस जास्तीचा पडेल, असा दावा करण्यात येत आहे.दरम्यान, राज्य आपत्कालीन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणी जास्त माहिती देणे टाळले.पाणीपुरवठामंत्र्यांनी सांगितलेपाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री याबाबत सांगू शकतील. कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचा आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रयोग होईल; पण कुठे, केव्हापासून सुरू होणार, हे माहिती नाही. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत प्रयोगासाठी २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादWaterपाणी