शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

औरंगाबादेत स्पर्धा परीक्षांमुळे कला शाखेस झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:39 PM

सर्वात कमी गुण मिळाल्यास कला शाखेला प्रवेश घेतला जातो. असा सर्वसाधारणपणे समज असतो. मात्र प्रशासनात अधिकारी होण्याच्या क्रेझमुळे हा ट्रेंड बदलत चालल्याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत येत आहे.

ठळक मुद्देदहावीत ९० टक्के आणि बारावीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी कला शाखेला प्रवेश घेत आहेत.

औरंगाबाद : सर्वात कमी गुण मिळाल्यास कला शाखेला प्रवेश घेतला जातो. असा सर्वसाधारणपणे समज असतो. मात्र प्रशासनात अधिकारी होण्याच्या क्रेझमुळे हा ट्रेंड बदलत चालल्याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत येत आहे. दहावीत ९० टक्के आणि बारावीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थीकला शाखेला प्रवेश घेत आहेत. यामागे स्पर्धा परीक्षांची तयारी असल्याचे मत प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्राध्यापक, प्राचार्यांनी व्यक्त केले.

दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विचारले असता, त्यांचा पहिला पसंतीक्रम हा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा असतो. त्यानंतर अभियांत्रिकी, इतर व्यावसायिक अभ्यासक्रम, वाणिज्य असा राहतो. सर्वात शेवटी कला शाखेचा विचार होतो. मात्र स्पर्धा परीक्षांची वाढलेली क्रेझ आणि त्यासाठी होणारी स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती देणे सुरू केले आहे. यात कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाला १२ वीत विज्ञान, वाणिज्य शाखेला ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि समाजशास्त्र या विषयांना सर्वाधिक प्राधान्य दिले. या विषयांचा फायदा एमपीएससी, यूपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. तसेच या स्पर्धा परीक्षेचा बदललेल्या अभ्यासक्रमांमध्ये याच विषयांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आल्यामुळे ज्यांना अधिकारी बनायचे आहे. त्यांचा ओढा याकडे अधिक असल्याचे निरीक्षण देवगिरीचे उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार यांनी नोंदविले. याच वेळी दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी कला शाखेला प्राधान्य दिले आहे. यातही अकरावीत कला शाखेत इंग्रजी माध्यमाचा प्रतिसाद मोठा असल्याचे मत स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. 

स्पर्धा परीक्षांची तयारी हेच कारणविज्ञान, वाणिज्य शाखेत उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात कला शाखेला प्राधान्य देत आहेत. इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास विषयाची निवड करीत आहेत. यामागे स्पर्धा परीक्षांची तयारी हेच कारण आहे. - डॉ. दिलीप खैरनार, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय

गुणवंत विद्यार्थी ठरवून कला शाखेत अकरावी कला शाखेला ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेले विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. यात कला शाखेत प्रवेश घेताना विद्यार्थी इंग्रजी माध्यमाची निवड करीत आहे. यामागे विद्यार्थ्यांची भावना ही इंग्रजी अवघड वाटू नये. इंग्रजी माध्यमाविषयी असणारी भीती दूर व्हावी आणि  आगामी शिक्षणात कोठेही इंग्रजीचा अडसर निर्माण होऊ नये, अशी आहे. यामुळे गुणवंत विद्यार्थी ठरवून कला शाखेला प्राधान्य देत आहेत.- प्रा. संजय गायकवाड, उपप्राचार्य, उच्च माध्यमिक,  स. भु. कला महाविद्यालय

आवड जपण्याचा प्रयत्न अकरावी कला शाखेतील इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझी आवड असणाऱ्या विषयात पुढे उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी ही निवड केली. माझ्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी प्राधान्यक्रम तर दिला नाही, उलट माझी आवड जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी कला शाखेची निवड केली आहे.- गायत्री कुलकर्णी, विद्यार्थिनी (दहावीत ९४ टक्के गुण)

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयartकलाAurangabadऔरंगाबाद