शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'क्षुल्लक वादातून झाली जाळपोळ,दगडफेक'; पोलीस आयुक्त निखील गुप्तांनी सांगितला घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 19:06 IST

या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात  400 ते 500 जणांवर दंगल घडवल्याप्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर: शहरातील किराडपुरा परिसरात बुधवारची रात्र आणि आजची पहाट यादरम्यान थरारक घटना घडल्या. समाजकंटकांनी केलेल्या दगडफेक, जाळपोळमुळे निर्माण झालेली तणावाची स्थिती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नियंत्रणात आणले. याप्रकरणी तब्बल ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या काळात नेमक काय झाले याबाबत पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीस बोलताना माहिती दिली आहे. 

पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितले की, बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास किराडपुरा भागातील राम मंदिराजवळ तरूणांच्या दोन गटात किरकोळ भांडण झाले. त्यानंतर एका गटातील तरूण निघून गेले. मात्र काही वेळानंतर या ठिकाणी गर्दी जमा झाली. पोलिसांनी या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या एक तासानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमा व्हायला सुरूवात झाली. त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केली. पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजकंटकांची संख्या जास्त असल्यामुळे पोलिसांना त्यांना थोपवणे  शक्य झाले नाही. घटनेची माहिती मिळताच माझ्यासह काही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आम्ही पोलिस बळाचा वापर करून तो जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. एक ते दीड तास हा प्रकार सुरू होता. जमावाने पोलिसांची आणि काही खासगी वाहने जाळली. पहाटे तीन-साडेतीन वाजेच्या सुमारास आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या सर्वावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

परिस्थिती जाणून कारवाई केली एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घटनास्थळी पोलिस उशिरा पोहोचले असा आरोप केला आहे. यावर पोलिस आयुक्त गुप्ता म्हणाले, समाजकटकांनी किराडपुरा भागातील लाईट फोडल्यामुळे अंधार झाला होता. अशावेळी नेमकी परिस्थिती काय आहे ते समजून घेणे गरजेचे असते. त्यामुळे परिस्थिती समजून घेऊनच आम्ही कारवाई केली.

राडा प्रकरणी ५०० जणांवर गुन्हा दाखलक्षुल्लक वादाचे पर्यवसन पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गेले. यात पोलिसांची वाहने, खाजगी वाहने जाळण्यात आली. १६ पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी आहेत. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात  400 ते 500 जणांवर दंगल घडवल्याप्रकर्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या कलमाखाली गुन्हा दाखल 307, 353, 295, 332, 333, 143, 147, 148, 149, 153 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसImtiaz Jalilइम्तियाज जलील