प्राणिसंग्रहालयात मगरीच्या सहा पिलांचे आगमन

By Admin | Updated: July 13, 2014 00:45 IST2014-07-13T00:33:12+5:302014-07-13T00:45:19+5:30

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालयातील मगरीने सहा पिलांना जन्म दिला आहे. आता संग्रहालयात ९ मगरी झाल्या आहेत.

The arrival of six piglets in the zoos | प्राणिसंग्रहालयात मगरीच्या सहा पिलांचे आगमन

प्राणिसंग्रहालयात मगरीच्या सहा पिलांचे आगमन

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालयातील मगरीने सहा पिलांना जन्म दिला आहे. आता संग्रहालयात ९ मगरी झाल्या आहेत. त्यांना कुठलाही संसर्ग होऊ नये, यासाठी दोन महिने पिलांची काळजी घेतली जाईल, असे डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात पिलांचा जन्म झाला. सध्या संग्रहालयात वाघ ५, पांढरे वाघ ४, बिबट्या मादी १, हत्ती २, अस्वल २, नीलगायी ८, सांबर ३५, काळवीट ४२, चितळ २, तडस ३, लांडगा १, सायाळ ४, उद्बिल्ला ५, इमू २, पाणपक्षी २८, माकड ३, मगर ९, चांदणी कासव ४९, पाण्यातील कासव ५ व विविध जातींचे ८८ सर्प, अशी २५० प्रकारची प्राणिसंपदा आहे.
संग्रहालयातील हत्ती अद्याप पाठविण्यात आलेले नाहीत. संग्रहालय विस्तारीकरणाचा आराखडा मंजूर झाला असून त्यावर लवकरच काम सुरू होण्याची शक्यता डॉ. नाईकवाडे यांनी वर्तविली.

Web Title: The arrival of six piglets in the zoos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.