शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

औरंगाबादेत साधू-संतांच्या आगमनाने चैैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:55 IST

इमारतीवरून होणारी पुष्पवृष्टी... रांगोळीने सजविलेले रस्ते... विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकांनी आणलेली रंगत... रविवारी (दि.२२) सकाळी अशा मंगलमय वातावरणात अध्यात्मयोगी आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव यांनी शहरात प्रवेश केला तेव्हा उपस्थित शेकडो श्रावक-श्राविकांनी ‘जयकारा गुरुदेव का जय जय गुरुदेव’ असा गगनभेदी जयघोष केला.

ठळक मुद्देचातुर्मास प्रवेश : पुष्पवृष्टी, जयजयकाराने शोभायात्रा लक्षवेधी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : इमारतीवरून होणारी पुष्पवृष्टी... रांगोळीने सजविलेले रस्ते... विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकांनी आणलेली रंगत... रविवारी (दि.२२) सकाळी अशा मंगलमय वातावरणात अध्यात्मयोगी आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव यांनी शहरात प्रवेश केला तेव्हा उपस्थित शेकडो श्रावक-श्राविकांनी ‘जयकारा गुरुदेव का जय जय गुरुदेव’ असा गगनभेदी जयघोष केला. चातुर्मासानिमित्ताने १९ साधू-संतांच्या आगमनाने सकल जैन समाजात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. एक अभूतपूर्व शोभायात्रा अनुभवल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रत्येक जण व्यक्त करीत होते.खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबाजारतर्फे चातुर्मास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो कि.मी.चा पायी प्रवास करून आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव ससंघ शहरात पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी सकाळी ६ वाजेपासून जैन समाजबांधव जमा झाले होते. महाराज ससंघाचे आगमन झाले तेव्हा सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आकाशवाणी चौकात सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी गुरुदेव ससंघाचे स्वागत केले. यावेळी खा.चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, प्रफुल्ल मालाणी आदींची उपस्थिती होती. यावेळी जालना रोडवरील इमारतीवरून साधू-संतांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ‘कोण आये भाई कोण आये... जैन धर्म के वीर आये’, ‘जयकारा गुरुदेव का जयजय गुरुदेव’ असा जयघोष केला जात होता. सुवासिनी मंगलकलश डोक्यावर घेऊन अग्रभागी चालत होत्या. काही महिलांनी हाती पंचरंगी ध्वज घेतला होता. तर काही महिला टाळ वाजवीत भजन म्हणत नृत्य करीत होत्या. पी. यू. जैन विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. युवकांच्या ढोल पथकाने ढोलवादन करून परिसर दणाणून सोडला होता. बँड पथकांनी धार्मिक, देशभक्तीपर गीत सादर करून शोभायात्रेची रंगत आणखी वाढविली. शोभायात्रेत आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव सर्वात पुढे, त्यांच्या मागे १९ साधू-संत व त्यांच्या मागे सर्व श्रावक-श्राविका चालत होते. शोभायात्रा मार्गावर जागोजागी सुरेख रांगोळी काढण्यात आल्या होत्या. जागोजागी गुरुदेवांचे पादप्रक्षालन केले जात होते. रस्त्याच्या कडेला थांबून भाविक गुरुदेव ससंघाचे दर्शन घेत होते.शोभायात्रा मोंढानाका, लक्ष्मण चावडी, गांधीनगर, मोतीकारंजा, चौराहा, किराणा चावडीमार्गे राजाबाजारातील जैन मंदिरात पोहोचली. येथे पार्श्वनाथ भगवंतांचे दर्शन घेऊन शोभायात्रा नवाबपुरा येथील हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल प्रांगणात पोहोचली. येथे १०८ दाम्पत्यांनी साधू-संतांचे पादप्रक्षालन केले तेव्हा हे दृश्य हजारो भाविकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवले. येथे आयोजित कार्यक्रमात जैन पंचायतचे अध्यक्ष ललित पाटणी, हिराचंद कासलीवाल परिवार यांनी गुरुदेवाचे पादप्रक्षालन केले. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले. यावेळी सकल जैन समाजाचे महावीर पाटणी, मिठालाल कांकरिया, तसेच अशोक अजमेरा, अ‍ॅड. एम. आर. बडजाते, विनोदकुमार लोहाडे, माणिकचंद गंगवाल, अ‍ॅड. डी. बी. कासलीवाल, अ‍ॅड. प्रमोदकुमार कासलीवाल, प्रकाश पाटणी, विजयकुमार पाटणी यांच्यासह सर्व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.अंतरात्म्यातील भगवंताला प्रकट करा - आचार्य विशुद्धसागरजीहिराचंद कस्तुरचंद कासलीवाल मैदानावरील भव्य धर्मपीठावर कमळाच्या सजावटीत आचार्य विशुद्धसागरजी गुरुदेव व १९ साधू-संत विराजमान झाले होते. यावेळी औरंगाबादपर्यंतच्या पायी प्रवासात साधू-संतांची सेवा करणारे संघपती, संजय कासलीवाल परिवार व अशोककुमार गंगवाल परिवाराचा गुरुदेव यांनी गौरव केला.प्रवचनात गुरुदेव म्हणाले की, आज शहरात तीर्थंकर महावीरांचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत. ज्यांना मंदिरात जावे वाटते, साधू-संतांचे प्रवचन ऐकावे वाटते ते सर्व श्रावक-श्राविका भविष्यातील भगवंत आहेत. आपल्या अंतरात्म्यातील भगवंताला प्रगट करा, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमAurangabadऔरंगाबाद