पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल

By Admin | Updated: May 23, 2015 00:40 IST2015-05-23T00:15:16+5:302015-05-23T00:40:43+5:30

पुरुषोत्तम करवा , माजलगाव जून महिन्यात अधिक मासाचा महिना येत आहे. तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असताना मंदिर

The arrival of devotees coming to see Purushottam | पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल

पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल


पुरुषोत्तम करवा , माजलगाव
जून महिन्यात अधिक मासाचा महिना येत आहे. तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असताना मंदिर व रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. प्रशासनाचे मात्र याकडे अद्यापही दुर्लक्षच आहे.
तीन वर्षांनंतर एकदा अधिक मासाचा महिना येतो. यावर्षी १७ जून रोजी अधिक मासाला सुरुवात होत आहे. तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर आहे. या महिन्यात पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे अधिक महत्त्व असते. भारतात दोन ठिकाणी पुरुषोत्तमाचे मंदिर आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून भाविक दर्शनासाठी पुरुषोत्तमपुरीत गर्दी करीत असतात. भाविकांच्या गर्दीमुळे व्यापाऱ्यांसह छोट्या-मोठ्या दुकानदारांची गर्दी असते. याचा फायदा ग्रा.पं.ला होतो. मात्र ग्रामपंचायतच्या वतीने मंदिराच्या दुरुस्तीसाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी भेट देऊन या ठिकाणचा विकास आराखडा तयार करुन यावर १३ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला, मात्र हा प्रस्ताव लालफितीत अडकलेला आहे. अधिक मास पंधरा-वीस दिवसांवर आलेला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची साधी डागडुजीही केलेली नाही. सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असून, भाविकांचे हाल होत आहेत.
मंदिराचीही दुरवस्था झालेली असून, अनेक ठिकाणी ते पडले आहेत. पुरात असलेल्या या मंदिराची खूपच दुरवस्था झालेली आहे. येथील ग्रा.पं.कडे मंदिर दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याने खर्च करू शकले नाहीत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दुरुस्तीची मागणी भाविकांमधून होत आहे. सध्या मंदिर व रस्त्याची दुरवस्था झाली असली तरी याच्या दुरुस्तीसाठी ग्रा.पं.कडे निधी नाही. प्रशासनाकडे मागणी केली, असल्याचे सरपंच शालिनी गोळेकर यांनी सांगितले.

Web Title: The arrival of devotees coming to see Purushottam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.