प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:04 IST2021-04-14T04:04:26+5:302021-04-14T04:04:26+5:30

शेख सरताज शेख आरेफ (२५, रा . तोफखाना) असे आरोपीचे नाव आहे. गतवर्षी २० जानेवारी रोजी आरोपीच्या वाढदिवसाच्या ...

Arrested for torturing a young woman out of love | प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार करणारा अटकेत

प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार करणारा अटकेत

शेख सरताज शेख आरेफ (२५, रा . तोफखाना) असे आरोपीचे नाव आहे. गतवर्षी २० जानेवारी रोजी आरोपीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्याची पीडितेची ओळख झाली होती. तेव्हा आरोपीने तिच्यासोबत छायाचित्र काढले होते. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. यादरम्यान ७ ऑगस्ट २०२० रोजी आरोपीने तिला बहाणा करून तिला स्वतःच्या घरी बोलावून घेतले. तिला ब्लॅकमेल करून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. आपण लग्न करू अशी थाप मारून तिला गप्प केले. त्याने तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. ही बाब तिने नुकतीच तिच्या नातेवाइकांना सांगितली. यानंतर ते तिच्यासह मंगळवारी छावणी पोलीस ठाण्यात आले आणि आरोपी सरताजविरुध्द बलात्काराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविली. फौजदार धर्मराज देशमुख आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने आरोपीला अटक केली.

Web Title: Arrested for torturing a young woman out of love