पाच हजारांची लाच घेताना शिरस्तेदारास अटक
By Admin | Updated: November 6, 2014 01:37 IST2014-11-06T01:05:34+5:302014-11-06T01:37:27+5:30
औरंगाबाद : वडिलोपार्जित प्लॉटवर भावाचे नाव कमी करून मुलाचे नाव लावण्यासाठी वैजापूरच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार विजय जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सिडको येथे अटक केली.

पाच हजारांची लाच घेताना शिरस्तेदारास अटक
औरंगाबाद : वडिलोपार्जित प्लॉटवर भावाचे नाव कमी करून मुलाचे नाव लावण्यासाठी वैजापूरच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार विजय जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सिडको येथे अटक केली.
वैजापूर येथे तक्रारदाराचा वडिलोपार्जित २००० स्क्वे. फुटाचा प्लॉट असून, सदरचा प्लॉट भावाच्या नावावर होता. भाऊ मतिमंद असल्याने त्याचे पालनपोषण तक्रारदारानेच केले होते. १८ मे २०१० रोजी भाऊ मयत झाल्याने त्या प्लॉटवरील भावाचे नाव कमी करून तक्रारदार व मुलाचे नाव लावण्यासाठी उपअधीक्षक कार्यालय वैजापूर येथे अनेकदा चकरा मारल्या. शिरस्तेदार विजय जाधव याची भेट झाली असता मी काम करून देतो, असे सांगून ५ हजारांची लाच मागितली; परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत पथकाला सदरची माहिती दिली. त्यानुसार खात्री करून ५ नोव्हेंबरला औरंगाबादेत येऊन
५ हजारांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारली अन् तो पथकाच्या सापळ्यात अडकला. यावेळी ही कारवाई परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डी.एस. स्वामी, पोलीस
उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे, निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, अनिता वराडे, कर्मचारी कैलास कामठे, श्रीराम नांदुरे, सुनील फेपाळे, सचिन शिंदे, अजय आवले आदींनी केली.