महिनाभरात पुन्हा घराफोडी
By Admin | Updated: November 24, 2014 00:35 IST2014-11-24T00:32:07+5:302014-11-24T00:35:25+5:30
भरदिवसा घरफोडीकळंब : तालुक्यातील ईटकूर येथे रविवारी भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला असून, यामध्ये सोने, चांदीचा ऐवज व रोख रक्कम असा ३६ हजाराचा ऐवज लंपास करण्यात आला आहे

महिनाभरात पुन्हा घराफोडी
भरदिवसा घरफोडीकळंब : तालुक्यातील ईटकूर येथे रविवारी भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला असून, यामध्ये सोने, चांदीचा ऐवज व रोख रक्कम असा ३६ हजाराचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. ऐन दिवाळी सणातच येथे सहा ठिकाणी घरफोडी झाल्याने आधीच दहशतीखाली असलेल्या ईटकूर ग्रामस्थांमध्ये या दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे खळबळ उडाली आहे.
ईटकूर येथील हरिदास विठ्ठल पावले यांचे प्रभाग क्र. १ मध्ये घर आहे. त्यांच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ, पत्नी व रविवारची सुट्टी असल्याने लहान मुलेही शेतात गेली होती. तसेच हरिदास पावले हे सुद्धा कामानिमित्त कळंबला गेले असल्याने घराला कुलूप लावण्यात आले होते. दुपारी दोनच्या सुमारास हरिदास पावले यांनी कळंबवरुन परत आल्यावर समोरील दाराचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला. यावेळी त्यांना मधल्या खोलीचे व चौकातील दार उघडे असल्याचे लक्षात आले. घरात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घुसून चोरी केल्याचा संशय त्यांना आला. तद्नंतर खोलीत घाबरलेल्या अवस्थेत प्रवेश करुन पाहिले असता, कपाटाची दारे उघडी तसेच कपाटातील काही सामान लगतच्या कॉटवर अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. या घटनेची त्यांनी तात्काळ कळंब पोलिस ठाण्याला माहिती दिली. यावरुन पोउनि सिद्धीकी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी कपाटातील ऐवजाची पाहणी केली असता, सोन्याचे झुबे अंदाजे १० ग्रॅम वजनाची फुले, चांदीचे करंड, वाटी व फुङपात्र असा चांदीचा १० हजाराचा ऐवज व रोख रक्कम एक हजार रुपये चोरीस गेल्याचे आढळून आले. सोने, चांदी व रोख रक्कम असा एकूण ३६ हजाराच ऐवज लंपास केल्याप्रकरणी हरिदास पावले यांनी कळंब पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करून कळंब पोलिसांनी मानाराम नातुराम वाघरी व बळीराम मोतीराम वाघरी (ह. मु. लातूर) यांना दोघांना अटक केली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सिध्दीकी करीत आहेत. (वार्ताहर)
ईटकूर येथे ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला चोरट्यांनी धूमाकुळ घातला होता. २१ नोव्हेंबरला बोद्धराज सुतार, विनायक सुरवसे, धनंजय गंभिरे, प्रवीण गंभिरे, शहाजी मते आदींच्या घरात घरफोडी करण्यात आली होती. यामुळे गावात एकच खळबळ उडून नागरिकांत चोरट्यांची दहशत निर्माण झाली होती. या प्रकाराला महिना लोटतो न लोटतो तोच रविवारी दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे.