शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपच्या वादात औरंगाबादची लावली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:21 IST

शहरातील कचरा प्रश्न पेटल्याचे पडसाद सलग तिस-या दिवशी विधिमंडळात उमटले. बुधवारी शहरात कच-यावरून दगडफेक, लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला.

ठळक मुद्देधनंजय मुंडे : सलग तिस-या दिवशी विधिमंडळात महापालिकेचा ‘कचरा’

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्न पेटल्याचे पडसाद सलग तिस-या दिवशी विधिमंडळात उमटले. बुधवारी शहरात कच-यावरून दगडफेक, लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडताना महानगरपालिका बरखास्त करण्याची जोरदार मागणी केली. सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या भांडणात औरंगाबादची वाट लावल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील कचºयाचा प्रश्न सत्ताधाºयांना सोडवता येत नसेल, तर या सरकारला लाज वाटली पाहिजे. गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेत ज्यांची सत्ता आहे, त्यांची ही जबाबदारी असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रश्नाची दखल घेऊन महापालिका बरखास्त करायला सांगितले आहे. शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही एक प्रकारची आणीबाणी निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासक नेमा अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. या गंभीर प्रश्नाच्या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार असून, शुक्रवारी चर्चा करण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी उत्तरात सांगितले.आमचे काय? यामुळे हा प्रश्न : आ. झांबडशहरातील कचºयाचा प्रश्न हा आमचे काय? या सत्ताधारी भाजप-शिवसेना नेत्यांच्या वृत्तीमुळे निर्माण झाला आहे. महापालिकेतील पदाधिकारी बदलले की हप्ता वाढतो. यातून विविध वेळा कंपन्या नाकारण्यात आल्या आहेत. कोणताही तोडगा काढला तरी आमचे काय? या प्रवृत्तीमुळे मार्ग निघणे कठीण आहे. यासाठी ही महापालिका बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेसचे आ. सुभाष झांबड यांनी विधान परिषदेत केली.दगडफेक करणाºया पोलिसांना निलंबित करा : आ. जलीलऔरंगाबाद : शहरातील कचºयाचा प्रश्न पेटला असतानाच पोलिसांनी कचºयाला विरोध करणाºया नागरिकांवर हल्ला चढवत स्वत:च गाड्यांची तोडफोड केली असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडिओतून समोर आला आहे. प्रत्येक नागरिकाला वाटते की, शहरातील कचरा माझ्या घराजवळ नको. हा नागरिकांचा हक्क आहे. मात्र, पोलिसांच्या दादागिरीने हद्द पार केली आहे. कचरा टाकण्यास विरोध करणारे नागरिक हे काही दहशतवादी नाहीत. यामुळे दगडफेक करून गाड्यांची तोडफोड करणाºया पोलिसांना निलंबित करण्याची मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी विधानसभेत केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला चौकशीचे निर्देश दिले. गृहराज्यमंत्र्यांनी याची तात्काळ चौकशी करून सभागृहात निवेदन करणार असल्याचेही सांगितल्याचे आ. जलील म्हणाले.‘कचºयात नगरसेवकांची पार्टनरशिप’शहरातील कचरा उचलणारी अर्धी वाहने ही महापालिकेची आहेत. उर्वरित अर्धा कचरा उचलणाºया यंत्रणेत संबंधित वॉर्डाच्या नगरसेवकांची पार्टनरशिप आहे. हे सगळे लागेबांधे बाहेर आले पाहिजेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे, महिला बचत गटाकडे कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेला आहे. राज्यातील एकाही महापालिकेत असा प्रकार नाही. या बचत गटांचा सर्वेसर्वा संबंधित वॉर्डातील नगरसेवक आहे. कचºयासाठी आतापर्यंत नगरसेवकांनी तीन वेळा परदेश दौरे केले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे सुद्धा सांगतात की, नगरसेवकांचा धंदा बुडेल म्हणून तोडगा काढण्यात येत नाही. यामुळे ही महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी विधान परिषदेत आ. सतीश चव्हाण यांनी केली.