निवडणुकीसाठी लागणार १६ हजार कर्मचाऱ्यांची फौज

By Admin | Updated: September 19, 2014 01:15 IST2014-09-19T00:20:13+5:302014-09-19T01:15:55+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी १६ हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.

Army of 16,000 employees to be elected | निवडणुकीसाठी लागणार १६ हजार कर्मचाऱ्यांची फौज

निवडणुकीसाठी लागणार १६ हजार कर्मचाऱ्यांची फौज

औरंगाबाद : जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी १६ हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे या कामासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचारी घेतले जाणार आहेत. निवडणूक शाखेने सध्या अशा कर्मचाऱ्यांची यादी बनविण्याचे काम सुरू केले आहे.
विधानसभेसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात ९ मतदारसंघ असून, सर्व मतदारसंघांमध्ये मिळून एकूण २७०० मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात पाच कर्मचारी लागणार आहेत.
याशिवाय दहा टक्के कर्मचारी राखीव म्हणून ठेवले जाणार आहेत. असे एकूण १५ हजार कर्मचारी लागणार आहेत. तसेच यावेळी शहरातील तीन मतदारसंघांत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होत आहे. त्यासाठीही एक हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण १६ हजार कर्मचारी लागणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक शाखेने सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील तसेच बँक, एलआयसीमधील कर्मचाऱ्यांचीही निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती.
यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी घेण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.

Web Title: Army of 16,000 employees to be elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.