शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

राज्यात शस्त्रागारांचा भार हवालदारांच्या खांद्यावरच

By admin | Updated: March 20, 2016 23:58 IST

औरंगाबाद : राज्यात स्वतंत्र शस्त्र शाखा स्थापन करून त्यावर पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी नेमला जाईल, असे शपथपत्र गृह विभागाने औरंगाबाद खंडपीठात वर्षभरापूर्वी दाखल केले होते.

औरंगाबाद : राज्यात स्वतंत्र शस्त्र शाखा स्थापन करून त्यावर पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी नेमला जाईल, असे शपथपत्र गृह विभागाने औरंगाबाद खंडपीठात वर्षभरापूर्वी दाखल केले होते. त्यावर खंडपीठाने जनहित याचिका निकाली काढली होती. मात्र, वर्ष उलटून गेल्यानंतरही गृह विभागाकडून पदस्थापनेसंदर्भातील कुठलीच हालचाल न झाल्याने अधिकाऱ्यांविना कर्मचाऱ्यांनाच हा भार सांभाळावा लागत आहे. पोलीस दलात श्वानपथक, बॉम्ब शोधक नाशक पथक, पोलीस मोटार परिवहन शाखा, पोलीस कल्याण निधी, वायरलेस इ. शाखा आहेत. याशिवाय अन्य तांत्रिक शाखाही स्थापन केल्या जातात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निरीक्षक दर्जाचा अधिकारी दिला जातो. त्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी पदोन्नतीही होते. मात्र, शस्त्रागारांची परिस्थिती त्याहून वेगळी आहे. फौजदार दर्जाचे अधिकारी देण्याची गरज असताना अगदीच सहायक फौजदार, हवालदार यांच्याकडे शस्त्रागार सांभाळण्याची जबाबदारी दिली जाते. विशेष म्हणजे पुढे त्यांची पदोन्नतीही केली जात नाही.मुंबई सोडून महाराष्ट्रातील शस्त्रांचा विचार केला तरी लाखो शस्त्रे आहेत; पण त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक ते मनुष्यबळ नाही. ज्या शस्त्रांच्या दुरुस्तीसाठी नऊ हजार अभियंत्यांची (तज्ज्ञ) आवश्यकता आहे. तिथे केवळ ५७७ अभियंते कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे १९९६ पासून या शाखेला ईएमई दर्जाचा अधिकारी नाही. पात्रतेच्या निकषात बसणारे अभियंते असूनही त्यांना संधी दिली जात नाही, असा आरोप सेवानिवृत्त शस्त्रागारप्रमुख पांडुरंग गायकवाड यांनी केला आहे.