शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
2
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
3
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
4
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
5
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
6
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
9
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
10
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
12
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
13
Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 
14
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
15
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
16
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
17
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
18
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
19
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
20
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या

बंद कंपनीच्या मालकीहक्कातून सशस्त्र हल्ला; सुरक्षारक्षक ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 5:24 PM

हल्लेखोरांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

औरंगाबाद: शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील चार वर्षापासून बंद पडलेल्या कंपनीच्या मालकीहक्कावरून दोन गटात १ मे रोजी रात्री जोरदार सशस्त्र हाणामारी झाली. याघटनेत कंपनीचा सुरक्षारक्षकावर तलवार, चाकूने हल्ला करण्यात आल्याने तो ठार झाला, तर सुरक्षारक्षक भावाला वाचविण्यासाठी धावलेल्या त्याचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. शिवाय हल्लेखोरांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात खून आणि खूनाचा प्रयत्न केल्याची वेगवेगळी गुन्हे  नोंदविली.

रिजवान खान रशिद खान (वय ३६,रा. टाऊन हॉल परिसर) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तर रिझवानचा लहान भाऊ  मेहराज खान रशिद खान आणि हल्लेखोर खालेद अबु तुराब (वय ४०,रा. रोशनगेट)आदिलखान नसीर खान (वय २५,रा. कटकटगेट), आवेश खान दोस्त मोहम्मद खान (वय २०,रा. टाऊन हॉल) हे जखमी झाले आहेत. अन्य आरोपी कैसर कुरेशी आणि माजीद हे किरकोळ जखमी झाले. 

याविषयी अधिक माहिती देताना चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, शेंद्रा एमआयडीसीमधील नूर इंटरप्रायजेस ही कंपनी बीफची चार ते पाच वर्षापासून बंद आहे. या कंपनीच्या मालकीहक्कावरून अब्दुल गणी कुरेशी , साजीद कुरेशी आणि खालेद अबु तुराब यांच्यात वाद सुरू आहे. सध्या ही कंपनी गणी कुरेशी यांच्या ताब्यात आहे. रिजवान हा नऊ वर्षापासून कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. तर मेहराज खान हा पाच वर्षापासून भावासोबत याच कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. रिजवान हे कंपनीतच राहत होता तर  त्यांचा   मेहराज हे रिजवान यांना  जेवणाचा डबा पुरवित.

१ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रिजवान आणि मेहराज हे दोघे भाऊ कंपनीच्या गेटवर बसलेले होते. यावेळी आरोपी खालेद , आदिल खान, आवेश खान, कैसर कुरेशी आणि माजीद हे एका वाहनातून कंपनीत आले असता रिजवान यांनी त्यांना कंपनीच्या बाहेर चला असे सांगितले. तुमचे जे काही म्हणणे आहे ते कंपनीमालकासोबत बोला, असे म्हणाला. यावेळी आरोपींनी रिजवानला शिवीगाळ करण्यास सुरवात केली आणि खालेदने अचानक रिजवानच्या पोटात चाकू खुपसला. रिजवानला वाचविण्यासाठी धावलेल्या मेहराजवर आरोपी कैसर कुरेशीने चाकूहल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. याघटनेत रिजवान घटनास्थळीच ठार झाला. याघटनेनंतर आरोपी कंपनीतून पळून गेले.

टॅग्स :ArrestअटकAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसShendra MIDCशेंद्रा एमआयडीसी