शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मजुरीच्या पैशांवरून भावंड भिडले; चाकू, कैचीने वार करून लहान भावाचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:07 IST

लहान भावाचा खून केल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी विनोद आव्हाड याला बुधवारी पहाटे खेडीफाटा येथील एका शेडमध्ये झोपलेला असताना ताब्यात घेतले.

चिंचोली लिंबाजी ( छत्रपती संभाजीनगर) : बांधकाम मजुरीच्या पैसे वाटपातून दारूच्या नशेत दोन भावांमध्ये झालेल्या वादानंतर मधल्याने लहान भावाचा चाकूने व कैचीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कन्नड तालुक्यातील दिगाव येथे घडली. सुनील भीमराव आव्हाड (वय ३६ वर्षे) असे मृताचे तर विनोद भीमराव आव्हाड असे आरोपीचे नाव आहे.

दिगाव येथील भीमराव आव्हाड यांना ४ मुले आहेत. त्यातील सर्वात मोठा प्रकाश, दुसऱ्या क्रमांकाचा विनोद आणि तिसऱ्या क्रमांकाचा सुनील भीमराव आव्हाड हे तीन भाऊ आई, वडिलांसह एकत्र राहात होते. तिघेही विवाहित असून, त्यांच्या बायका सोबत राहात नाहीत. ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. तीन-चार दिवसांपूर्वी आई, वडील दवाखान्याच्या कामासाठी मुंबई येथे राहात असलेल्या सर्वात लहान चार नंबरच्या मुलाकडे गेले होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे तिघे भाऊ खेडीफाटा येथे बांधकाम मिस्तरीच्या हाताखाली काम करून सायंकाळी घरी आले. तिघांनी चिकन आणून बिर्याणी तयार केली. मोठा भाऊ प्रकाश बाहेर गेल्यानंतर आरोपी विनोद व मयत सुनील या दोघा भावांनी सोबत दारू प्राशन केली. यानंतर नशेत या दोघांमध्ये मजुरीच्या पैसे वाटपातून वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोन नंबरचा भाऊ विनोदने बाजूलाच पडलेल्या चाकूने लहान भाऊ सुनील याच्या गळ्यावर, पाठीवर सपासप वार केले. यात सुनील गंभीर जखमी झाला.

ही बाब शेजाऱ्यांनी सरपंच पुंजाराम सुसूंद्रे व ग्रा. पं. सदस्य दिगंबर सुसूंद्रे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने जखमी सुनील याला सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पिशोरचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव नागवे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. याबाबत मोठा भाऊ प्रकाश आव्हाड यांच्या फिर्यादीवरून पिशोर पोलिसांनी विनोद आव्हाड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. बुधवारी दुपारी १ वाजता उत्तरीय तपासणी केल्यानंतर दुपारी ४ वाजता मयत सुनील याच्या पार्थिवावर दिगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, तीन भाऊ असा परिवार आहे.

खुनानंतर झोपलेल्या आरोपीला अटकलहान भावाचा खून केल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी विनोद आव्हाड याला बुधवारी पहाटे खेडीफाटा येथील एका शेडमध्ये झोपलेला असताना ताब्यात घेतले. यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. पोलिस आरोपीला गुरूवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी