खाजगी दूध संकलन केंद्रांची मनमानी

By Admin | Updated: September 17, 2015 00:27 IST2015-09-17T00:23:44+5:302015-09-17T00:27:08+5:30

मुकुंद चेडे , वाशी दुधाचा दर ११ सप्टेंबर पासून खाजगी दूध संकलन करणाऱ्याकडून कमी केल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Arbitrage of private milk collection centers | खाजगी दूध संकलन केंद्रांची मनमानी

खाजगी दूध संकलन केंद्रांची मनमानी

मुकुंद चेडे , वाशी
दुधाचा दर ११ सप्टेंबर पासून खाजगी दूध संकलन करणाऱ्याकडून कमी केल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दुग्ध व्यवसाय हा सध्यस्थितीमध्ये पूर्णपणे तोट्यात चालला आहे. पशुखाद्याच्या दरात व दूधाच्या दरात मोठी तफ ावत निर्माण झाली असून दुष्काळीस्थितीमध्ये दूध खरेदी करणाऱ्या खाजगी व्यावसायिकाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी होत आहे.
गेल्या दोन आठवड्यापूर्वी ३.५ फ ॅट व ८.५ एसएनएफ असल्यास केवळ १७ रूपये भाव होता यामध्ये बदल वाढ होऊन २० रूपये दर केला होता मात्र पुन्हा दुग्ध पावडरचे दर घसरल्याचे कारण पुढे करत २० रूपयावरून १९ रूपये दूध खरेदीचा दर केला आहे. यामध्येही जर एसएनएफ कमी आल्यास पुन्हा भाव कमी होत आहे. याकडे शासनकर्त्याचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामातून एक रूपयाही उत्पन्न नसून दूधापासून चार पैसे हातात येतील म्हणून दुग्ध व्यवसाय करावा म्हटले तर त्याचेही कमी करण्यात आले आहेत. वाशी व भूम तालुक्यात सध्या विविध कंपन्याच्या दूध संकलन केंद्रामाफर् त दूध खरेदी करण्यात येते मात्र या सर्व खाजगी कंपन्या ठरवून दूधाचे भाव कमी जास्त करीत असल्याचा दूग्धउत्पादकांचा आरोप आहे. शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही होत आहे.

Web Title: Arbitrage of private milk collection centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.