आखाड्यास आग; दीड लाखांचे नुकसान

By Admin | Updated: February 26, 2016 11:36 IST2016-02-26T11:27:28+5:302016-02-26T11:36:11+5:30

शेतातील आखाड्यास आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे घडली.

Aqua fires; Loss of one and a half million | आखाड्यास आग; दीड लाखांचे नुकसान

आखाड्यास आग; दीड लाखांचे नुकसान

बोरी : शेतातील आखाड्यास आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे २२ फेब्रुवारी रोजी घडली. 
जिंतूर तालुक्यातील दुधगावयेथील विठ्ठल देवराव जाधव यांचा शेतामध्ये आखाडा आहे. २२ फेब्रुवारी रोजी या आखाड्यास अचानक आग लागली. या आगीमध्ये गाडी, पाईप, रासायनिक खताच्या बॅगा, फवारे, ताडपत्री, टीनची १४ पत्रे आदी शेती औजारे जळून खाक झाले. 
या प्रकरणी विठ्ठलराव जाधव यांनी बोरी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. जमादार प्रकाश पंडीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विठ्ठलराव जाधव, तलाठी बडगुजर, प्रकाश आसेगावकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे जाधव यांनी केली आहे. /

Web Title: Aqua fires; Loss of one and a half million