साडेतीन कोटीच्या कामांना मंजूरी
By Admin | Updated: August 20, 2014 23:56 IST2014-08-20T23:40:57+5:302014-08-20T23:56:04+5:30
हिंगोली : ३ कोटी ४३ लाख ६४ हजारांच्या कामांना यंदा मंजूरी मिळाली

साडेतीन कोटीच्या कामांना मंजूरी
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या लघूसिंचन विभागाच्या ३ कोटी ४३ लाख ६४ हजारांच्या कामांना यंदा मंजूरी मिळाली. प्रामुख्याने चार पाझर तलावांसाठी १ कोटी ८३ लाख ४५ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पावसाचे पाणी पडले तिथेच मूरवण्यासाठी लघूसिंचन विभाग विविध उपाययोजना करते. त्यातून पाणीपातळी वाढवण्यासाठी ओढे, नाल्यांवर बंधारे बांधले जातात. गावपातळीवर शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलाव उभारले जातात. कोल्हापूरी बंधारे, उपबंधारे, सिमेंट बंधारे आदीच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी अडवले जाते.
यंदा जिल्ह्यातील चार उपशिर्षांखाली विविध कामांसाठी साडेतीन कोटीचा निधी खर्च केला जाणार आहे.
लघू पाटबंधारेमधील पाझर तलावासाठी १ कोटी ६९ लाख ६२ हजारांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यातील चार तलावांसाठी १ कोटी ८३ लाख २४ हजारास मंजूरी मिळाली. कोष व सिमेंट बंधाऱ्यासाठी ५७ लाख ७२ हजाराच्या प्रस्तावात ६० लाखांची तरतूद केली.
प्रत्येकी १० लाखांचे ६ सिमेंट बंधारे उभारण्यात येणार आहेत. ६९ गावांतील जलसंधारण, शेतीसाठी १७ लाख ८ हजारांचे प्रस्ताव होता. त्यात औंढा तालुक्यातील भोसी येथे पाझर तलाव उभारण्यात येणार असून एकूण २४ लाख २३ हजारांची तरतूद केली. उपबंधाऱ्यांसाठी ८६ लाख १७ हजारांच्या कामास मंजूरी मिळाली. यात ६ ठिकाणी सिमेंटचे बंधारे उभारण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता फय्याज यांनी दिली. यामुळे जिल्ह्यात लघुसिंचनाच्या कामाला गती ्रमिळणार आहे. (प्रतिनिधी)
मंजूर कामे अशी
पाझर तलाव - लोहरा खु- ता. औंढा, कुरूंदा- ता.वसमत, हरवाडी- ता.कळमनुरी, गोरेगाव- ता.सेनगाव, भोसी- ता. औंढा. सिमेंट बंधारे- रेणापूर -ता.कळमनुरी, खिल्लार-ता.सेनागव, पिंपरखेडा-ता. सेनगाव, एकंबा-ता. हिंगोली, पारडा-ता. हिंगोली, ता. सेनगाव. उपबंधारे -घोळवा, वाई, खापरखेडा, मुंडळ, काळ्याची वाडी -सर्व ता. कळमनुरी.