शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

४२६ कोटींच्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:30 IST

सुमारे ४२६.२६ कोटी रुपये खर्चाच्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेस (भाग-३) राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्यामुळे वार्षिक ५५ दलघमी पाण्याचा वापर होणार आहे. संपूर्णत: ठिबकद्वारे एकूण १० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र व सुमारे ४० गावांना सिंचन पाण्याचा लाभ हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. या योजनेच्या सर्व्हेचे टेंडर फ्लोट झाले असून, कालच राज्य सरकारने शासन निर्णयही निर्गमित केला आहे. येत्या आॅगस्टमध्ये कामास प्रारंभ होईल व २०२१ पर्यंत काम पूर्ण होईल,

ठळक मुद्देप्रशांत बंब : गंगापूर तालुक्याचा पाणी प्रश्न सुटणार

औरंगाबाद : सुमारे ४२६.२६ कोटी रुपये खर्चाच्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेस (भाग-३) राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्यामुळे वार्षिक ५५ दलघमी पाण्याचा वापर होणार आहे. संपूर्णत: ठिबकद्वारे एकूण १० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र व सुमारे ४० गावांना सिंचन पाण्याचा लाभ हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. या योजनेच्या सर्व्हेचे टेंडर फ्लोट झाले असून, कालच राज्य सरकारने शासन निर्णयही निर्गमित केला आहे. येत्या आॅगस्टमध्ये कामास प्रारंभ होईल व २०२१ पर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती आज येथे एका पत्रपरिषदेत गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी दिली.त्यांनी सांगितले की, सिल्लेगाव, बुट्टेवाडगाव, वजनापूर, शेकटा, सिद्धनाथ वडगाव, गोळेगाव, शहापूर, घोडेगाव, खादगाव, गाजगाव, पळसगाव, कनकुरी, कोबापूर, बोरगाव, डोमेगाव, येसगाव, दिघी, काळेगाव, शिरोडी, मलकापूर, नरसापूर, भोयगाव, पेंडापूर व सारंगपूर या गावांना या योजनेचा फायदा होईल. जलआराखड्यानुसार प्रत्येक आमदाराने अशा योजना मंजूर करून घेतल्यास मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा वापर होऊ शकेल. दुर्दैवाने असे घडत नाही आणि मतदारही आपला दबाव मतदारांवर ठेवत नाही. लोकप्रतिनिधी लग्नसोहळ्याला व अंत्यसंस्काराला आला की, त्यातच जनता खुश राहते. विकास योजनांसाठी मतदारांचा लोकप्रतिनिधींवर दबाव आवश्यकच आहे.ब्रह्मगव्हाण योजनेसाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, राज्यपाल कार्यालय, वित्त विभाग व संबंधित मंत्री यांच्याकडे १८० बैठका झाल्या. २०१५ पासून पाठपुरावा सुरू केला होता. पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने योजनेच्या सर्वेक्षणासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सर्वेक्षण होताच पर्यावरण मान्यता घेतली जाईल, दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात करून २०२१ अखेरीस योजना पूर्ण केली जाईल, अशीही माहिती आ. प्रशांत बंब यांनी यावेळी दिले. योजनेची सविस्तर माहितीही त्यांनी दिली. अर्थात, या योजनेचा फायदा खुलताबादला होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.वॉटरग्रीडमधून बऱ्याच योजना सुरू होतील, असे सांगून न्यायालयीन प्रक्रियेनंतर गंगापूर साखर कारखाना सुरू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDamधरण