नागरी दलित वस्ती पाणीपुरवठ्यासाठी ३२ लाखांच्या निधीला बैठकीत मंजुरी
By Admin | Updated: October 15, 2016 01:16 IST2016-10-15T01:01:08+5:302016-10-15T01:16:57+5:30
परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरी दलितवस्ती पाणीपुरवठा प्रकल्प अंमलबजावणीसाठी सभापती आशाताई वायवळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात

नागरी दलित वस्ती पाणीपुरवठ्यासाठी ३२ लाखांच्या निधीला बैठकीत मंजुरी
परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरी दलितवस्ती पाणीपुरवठा प्रकल्प अंमलबजावणीसाठी सभापती आशाताई वायवळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत २०१६-१७ साठी ३२ लाखांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
मनपाच्या वतीने नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा प्रकल्प अंमलबजावणीसाठी सभापती आशाताई वायवळ यांच्या अध्यक्षतेखाली १४ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये वायवळ यांनी सन २०१६-१७ साठी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा याबाबत बैठकीत विषय मांडला. या विषयावर अतुल सरोदे, कस्तुराबाई कांबळे, सचिन कांबळे यांनी अनुमोदन देऊन ३२ लाख रुपये खर्च मान्यता देऊन शासनाकडे पाठविण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावामध्ये नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा प्रकल्प अंमलबजावणी या समितीचे सदस्य यांच्या सूचनेनुसार १ लाख रुपये निधी देण्याचे ठरले. या निधीतून आवश्यक वस्तंूची पूर्तता करण्यासाठी कामे करण्यात येतील, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच शहरातील समाजमंदिर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शन देणे व १ हजार लिटर पाण्याची टाकी देण्यात यावी, तसेच नळाला अर्धा इंची मोटार बसविण्याचे आदेश देण्यात आले. समाजकल्याण सभापती सचिन कांबळे, आकाश लहाने, राहुल साळवे, पंकज खेडकर यांनी अनुमोदन दिले. गटनेते अतुल सरोदे यांनी शहरातील जलकुंभ या ठिकाणी लेआऊट व्हॉल्व्ह बसविण्याच्या सूचना केल्या. बैठकीस नगरसचिव चंद्रकांत पवार, प्रभारी शहर अभियंता वसीम पठाण, सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते.